शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

GokulMilk Election-सरूडकरांच्या निर्णयाने शाहू आघाडीत अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 11:37 IST

GokulMilk Election Kolhapur-गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने धक्के देण्यास सुरुवात केल्याने विरोधी शाहू आघाडीमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. आघाडी एकसंध ठेवण्याबरोबरच पुढच्या व्यूहरचनेसाठी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची बैठक झाली.

ठळक मुद्देसरूडकरांच्या निर्णयाने शाहू आघाडीत अस्वस्थता हसन मुश्रीफ, सतेज पाटील, नरके, आदींच्या बैठकीत खलबत्ते

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने धक्के देण्यास सुरुवात केल्याने विरोधी शाहू आघाडीमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. आघाडी एकसंध ठेवण्याबरोबरच पुढच्या व्यूहरचनेसाठी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची बैठक झाली.शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी विरोधी शाहू आघाडीला धक्का देत सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी दिवसभर आघाडीमध्ये वेगवान हालचाली सुरू होत्या. आघाडीतील इतर नेत्यांसह प्रमुखांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दुपारी मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, चंद्रदीप नरके, विश्वास पाटील, आदींची बैठक झाली. यामध्ये सत्तारूढ गटाच्या धक्कातंत्राला कसे उत्तर द्यायचे, याची चाचपणी केली.आज, विरोधी आघाडीची बैठकविरोधी शाहू आघाडीची बैठक आज, शनिवारी दुपारी बारा वाजता होत आहे. गळती रोखून आघाडी भक्कम करण्यासाठी काय करता येईल, याबाबतची रणनीती ठरविली जाणार आहे.आबिटकर, राजेश पाटील यांचे मन वळविण्याचे प्रयत्नआमदार प्रकाश आबिटकर व राजेश पाटील हे सत्तारूढ गटाच्या सोबत जाणार आहेत, याची कुणकुण शाहू आघाडीच्या नेत्यांना लागली आहे. या दोघांची मने वळविण्याची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्यावर सोपविल्याचे समजते.

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर