अट्टल घरफोड्या उत्तम बारडकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: July 14, 2016 00:54 IST2016-07-14T00:54:02+5:302016-07-14T00:54:02+5:30
४५ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस

अट्टल घरफोड्या उत्तम बारडकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : पोलिस रेकॉर्डवरील अट्टल घरफोड्या उत्तम राजाराम बारड (वय २२, रा. धामोड, ता. राधानगरी) याच्याकडून ४५ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले.
लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व गांधीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चार घरफोड्यांमधील सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आणखी काही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करायचा आहे, अशी माहिती लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बुधवारी दिली.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोरील परमपूज्य शिवरामपंत वाडकर महाराजांच्या समाधी मंदिरासह पाच बंद दुकाने एका रात्रीत फोडली होती. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी बारडला अटक केली. त्याचे पोलिस रेकॉर्ड तपासले असता जिल्ह्यांत ४५ घरफोड्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने गांधीनगर येथे नंदलाल भावनदास नरसिंघानी यांच्या मालकीचे कापड दुकान तसेच रंकाळा स्टँड परिसरातील गजानन पंढरीनाथ बोंगाळे (रा. शिवाजी पेठ) यांचे सिमेंट दुकान फोडल्याची कबुली दिली आहे.