शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

रानडूक्कराच्या शिकारीसाठी शेतात ठेवला गावठी बाँब, अन्..; करवीर तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 19:10 IST

..अन्यथा अनर्थ घडला असता

दिंडनेर्ली: रानडूक्कराच्या शिकारीसाठी अज्ञाताने शेतात गावठी बाँब ठेवला होता. या बाँबच्या स्फोटात एका कुत्र्याचा मृत्यू झाला. नंदगाव (ता. करवीर) येथील हरी राऊ साठे यांच्या पाटलाचा माळ परिसरातील शेतात ही घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर हरी साठे यांनी तत्काळ इस्पुर्ली पोलिसांत तक्रार दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव दिंडनेर्ली रस्त्याच्या बाजुला पाटलाचा खडक परिसरातील नंदगाव  येथील हरी राऊ साठे यांची ऊसशेती आहे. सोमवारी सकाळच्या दरम्यान चार ते पाच कुत्री फिरत होतीत. तेव्हा अचानक मोठा स्फोटाचा आवाज येऊन धुर येऊ लागला. बाजूच्या शेतात ऊसतोड सुरु असलेने ऊसतोड कामगारांनी या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना कुत्रे तळमळत पडलेले दिसले. तर बाजुलाच गुंडाळी केलेले दोऱ्याचे तुकडे दिसले.रानडुकराच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवून शेतामध्ये जागोजागी ठेवले जातात. डुक्कर  तोंडात पकडून तोडायचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा स्फोट होतो व शिकाऱ्याचा प्रयोग यशस्वी होतो. पण डुक्करा ऐवजी या कुत्र्यानेच हा बॉम्ब तोंडात पकडल्याने हकनाक बळी गेला...अन्यथा अनर्थ घडला असताआजच या शेतात भांगलणीसाठी महिला आल्या होत्या. तत्पूर्वीच हा प्रकार घडला अन्यथा महिला काम करीत असताना चुकून यावरती पाय पडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. तसेच ऊसतोड चालू असल्याने ऊसतोड कामगारांची मुले या ठिकाणीच खेळत असतात.अशा प्रकारे जेव्हा शिकार केली जाते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी चार ते पाच बॉम्ब ठेवले जातात. त्यामुळे अजून त्या शेतामध्ये बॉम्ब असण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर