संशोधन सुविधेमुळे विद्यापीठ अव्वल
By Admin | Updated: December 23, 2014 23:40 IST2014-12-23T23:23:25+5:302014-12-23T23:40:16+5:30
जी. डी. पाटील : ‘वारणा’तर्फे एन. जे. पवार यांचा सत्कार

संशोधन सुविधेमुळे विद्यापीठ अव्वल
वारणानगर : गुणवत्ता संशोधन सुविधेच्या निकषावर शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’मध्ये महाराष्ट्रात अव्वलस्थान मिळविल्याचे प्रतिपादन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाने ‘नॅक’मध्ये ३.१६ गुण मिळवून पुणे व मुंबई विद्यापीठांना मागे टाकीत राज्यात अव्वलस्थान प्राप्त केले. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांचा वारणा विभाग शिक्षण मंडळाच्यावतीने जी. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी विद्यापीठाने अध्यापक शिक्षण गुणवत्ता, डाटा सेंटर, अकॅडमिक रिसर्च डॉक्युमेंटेशन सेंटर, ग्रीन आॅडिट या सर्व बाबतीत उल्लेखनीय प्रगती केल्याचे सांगून या कार्याचा गौरव केला.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, रजिस्ट्रार डॉ. डी. व्ही. मुळे, बी. सी. यु. डी. संचालक डॉ. ए. बी. राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांचेही अभिनंदन केले. या सत्कारप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. व्ही. आणेकर, प्राचार्या डॉ. सुरेखा शहापुरे, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, प्रा. एम. जी. चिखलकर, प्रा. किरण पाटील, आदी उपस्थित होते.