विकासकामांसाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST2021-09-23T04:27:05+5:302021-09-23T04:27:05+5:30

कसबा बीड (ता. करवीर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसर व आरोग्य उपकेंद्र परिसर अशा तेरा लाख रुपयांच्या विकासकामांच्या आयोजित प्रारंभप्रसंगी ...

Unity of workers is important for development work | विकासकामांसाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची

विकासकामांसाठी कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची

कसबा बीड (ता. करवीर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसर व आरोग्य उपकेंद्र परिसर अशा तेरा लाख रुपयांच्या विकासकामांच्या आयोजित प्रारंभप्रसंगी पाटील बोलत होते.

अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव तिबिले होते .

यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला . यावेळी राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करू. कार्यक्रमात कुंभी-कासारीचे संचालक उत्तमराव वरुटे , मुकुंद पाटील, शामराव सूर्यवंशी, भगवानराव सूर्यवंशी, आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक दिनकर सूर्यवंशी यांनी केले. सरपंच सर्जेराव तिबिले यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश तिबिले, पंडित वरुटे, दिनकर गावडे, सर्जेराव सूर्यवंशी, उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, वैशाली पाटील, ग्रामसेवक संदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Unity of workers is important for development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.