शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

चंदगडमध्येही कुपेकर गटाची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:13 IST

Gokul Milk Elecation Chandgad Kollhapur-गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे.

ठळक मुद्देचंदगडमध्येही कुपेकर गटाची एकजूटबैठकीत निर्धार : आगामी निवडणुका ताकदीने लढविणार

गडहिंग्लज : गडहिंग्लज पाठोपाठ चंदगड तालुक्यातील कुपेकर गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकीची मूठ बांधली. गोकुळसह आगामी सर्व निवडणुका एकजुटीने व ताकदीने लढण्याचा निर्धार प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत केला आहे.चंदगड येथील सोयरिक मंगल कार्यालयात ही बैठक झाली. तत्कालीन आमदार संध्यादेवी कुपेकर व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी अचानक विधानसभेच्या निवडणुकीत माघार घेतल्यानंतर आलेली मरगळ झटकून त्यांचे समर्थक पुन्हा एकत्र आल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.माजी जि. प. सदस्य बाबूराव हळदणकर म्हणाले, कुपेकर गट म्हणजे एक कुटुंब आहे. कुटुंबातील एकी कायम राखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. गणेश फाटक म्हणाले, नंदाताई लवकरच पुन्हा राजकारणात सक्रीय होतील. गोकुळ, केडीसीसी, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील. विलास पाटील म्हणाले, नंदाताई पुन्हा सक्रीय होणार असतील तर आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. विष्णू गावडे म्हणाले, संध्यादेवी व नंदाताई यांच्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काम करण्याची संधी मिळाली.यावेळी निंगू भादवणकर, प्रताप डसके, दत्तू विंझणेकर, बबन देसाई व बंडोपंत रावराणे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस भैरू खांडेकर, रघुनाथ नाकाडी, नागोजी नाईक, दिपक चांदेकर, मधुकर मोटार, नारायण गावडे, रवळनाथ गावडे, सुनिल देसाई, संजय राऊत, अजित गावडे, दौलत दळवी, अजमल नाईक, शाहरूख व्यापारी, अरीफ खेडेकर, ईस्माईल शहा, झाकीर नाईक, अब्दुल मुल्ला, शिवराज देसाई, आप्पाजी गावडे, आनंदराव भोसले, सागर पाटील, विनोद पाटील, बसवंत अडकूरकर, विलास चव्हाण, सचिन दळवी, संतोष गावडे आदी उपस्थित होते.निष्ठावंतांना सापत्नाची वागणूकस्व. बाबासाहेब कुपेकर यांनी चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा पाया घातला. त्यांच्या पश्चात संध्यादेवी व नंदातार्इंनी पक्षाची मजबूत बांधणी केली, त्यांच्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळाला. परंतु, अलिकडच्या काळात कुपेकर गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. यासंदर्भात लवकरच शिष्टमंडळाने वरिष्ठांची भेट घेणार आहोत, असे तजमुल फणीबंद यांनी सांगितले. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकchandgad-acचंदगडkolhapurकोल्हापूर