श्यामकांत जाधव यांची चित्रे पाहण्याची अनोखी संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 07:01 PM2020-03-05T19:01:13+5:302020-03-05T19:01:30+5:30

रंगबहार संस्था व श्यामकांत जाधव प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनमध्ये झाले.

Unique opportunity to see pictures of Shyamakant Jadhav | श्यामकांत जाधव यांची चित्रे पाहण्याची अनोखी संधी

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कै. श्यामकांत जाधव यांच्या कलाकृतींचे त्यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे रोपाला पाणी घालून उद्घाटन करताना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी. शेजारी सुहासिनी जाधव, रियाज शेख, चंद्रकांत जोशी, रवींद्र ओबेराय, संजीव संकपाळ, धनंजय जाधव, मनोज दरेकर, सुरेश मिरजकर, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देश्यामकांत जाधव यांची चित्रे पाहण्याची अनोखी संधी

कोल्हापूर : रंगबहार संस्था व श्यामकांत जाधव प्रतिष्ठानच्या वतीने दिवंगत चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनमध्ये झाले.

चित्रकार श्यामकांत जाधव यांचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, लेखन, कलासंबंधित कार्य त्यांच्या वयाच्या ८८ व्या वर्षीही अखंडपणे सुरू होते. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर हे कलापूर म्हणून ओळखले जाते. सध्याची पिढी या क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करीत आहे. ती समाजाभिमुख होईल, या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुक्त कलशेट्टी यांनी केले. प्रदर्शनात जाधव यांनी काढलेल्या बॉलपेन, वॉटर कलर, अ‍ॅक्र ालिकमधील ३२ निसर्ग व रचनाचित्रे मांडण्यात आली आहेत.
रवींद्र ओबेरॉय यांनी श्यामकांत जाधव यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले. संजीव संकपाळ यांनी आभार मानले. चंद्रकांत जोशी, सुहासिनी जाधव, धनंजय जाधव, संजीव संकपाळ, विश्रांत पोवार, अशोक धर्माधिकारी, विलास बकरे, अस्मिता जगताप, सुधीर पेटकर, अजेय दळवी, विजय टिपुगडे, सुरेश पोतदार, मनोज दरेकर, अजय कोराणे, आदी उपस्थित होते.

सात मार्चपर्यंत खुले

शाहू स्मारक भवनात हे प्रदर्शन शनिवार (दि ७) पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री आठपर्यंत खुले राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजय जाधव व चित्रकार संजीव संकपाळ यांनी केले आहे.
 

 

Web Title: Unique opportunity to see pictures of Shyamakant Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.