शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी अनोखा उपक्रम; दांडपट्टयाने कापले 4001 लिंबू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 17:35 IST

शांतीदूत मर्दानी खेळाचा आखाड्याचा वर्धापन दिन

कोल्हापूर : हलगी घुमक अन कैताळाच्या दणदणाट... छत्रपती शिवाजी महाराज की जय...असा अखंड जयघोष...अशा स्फूर्तीदायी वातावरणातशांतीदूत मर्दानी खेळाच्या आखाड्याचा मावळा गफूर रेहाना मुजावरने प्रजासत्ताक दिनी रविवारी ४००१ लिंबू दांडपट्टयाने कापून अनोखा उपक्रम साजरा केला. दोन तासात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन हे लिंबू कापून गफूरने उपस्थितांची टाळ्या अन शिट्यांनी दाद मिळविली.

शांतीदून मर्दानी खेळाच्या अखाड्याच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार पेठेतील विभागीय क्रीडा संकुलासमोर ४००१ लिंबू कापण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी १० वाजता गफूर रेहाना मुजावरने एकापाठोपाठ एक असे लिंबू दांडपट्टयाने कापायला सुरुवात केली. सोबतीला हलगी, घुमके, कैताळाचा दणदणाट व छत्रपती शिवरायांचा जयघोष असे स्फूर्तीदायी वातावरण होते. बघता बघता दोन तासातच या मावळ्याने तब्बल ४००१ लिंबू आपल्या दांडपट्टयाने कापले.

त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शांतिदूत मदार्नी आखाड्याचे प्रशिक्षक अतुल शिंदे, सूरज केसरकर, हिंद मर्दानी खेळाचा आखाड्याचे श्रीकांत खोत, राजे प्रतिष्ठान मर्दानी खेळाच्या आखाड्याचे दिलीप जाधव, छावा मर्दानी खेळाच्या आखाड्याचे चंद्रकांत पोर्लेकर, शेखर जाधव, विद्या माने यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRepublic Dayप्रजासत्ताक दिनMaharashtraमहाराष्ट्र