शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री कोल्हापुरात; ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चा घेणार आढावा 

By राजाराम लोंढे | Updated: May 2, 2024 14:30 IST

महायुतीच्या नेत्यांना देणार कानपिचक्या

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज, गुरुवारी रात्री कोल्हापुरात येणार आहेत. कोकणातील सभा झाल्यानंतर ते उशिरा दाखल होत असून ते ‘कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. महायुतीच्या नेत्यांना ते कानपिचक्या देणार असल्याचे समजते.महायुतीचे ‘कोल्हापूर’चे उमेदवार संजय मंडलीक व ‘हातकणंगले’चे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन हवा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी दोन दिवस तळ ठोकला होता, त्यांच्या जोडण्या सुरुच आहेत.सिंधुदुर्ग -रत्नागिरी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी त्यांची गुरुवारी सभा होत आहे. ती सभा आटपून ते कोल्हापूरात उशिरा दाखल होणार आहेत. एका हॉटेलवर ते थांबणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. विशेषता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तीगत बोलणार आहेत. आगामी चार दिवसात कशा पध्दतीने प्रचार यंत्रणा सक्रीय करायची, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याशिवाय काही महत्वाचे नेत्यांसह व्यावसायिकांशी ते चर्चा करणार असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Amit Shahअमित शाह