शुल्क न आकारणारे सर्वसामान्यांचे ग्रंथालय...

By Admin | Updated: July 20, 2015 00:14 IST2015-07-20T00:14:16+5:302015-07-20T00:14:49+5:30

जाहिरातबाजी करण्यापेक्षा दर्जेदार पुस्तकांसह कोणाचाही मुक्त संचार असलेले ग्रंथालय म्हणजे दौलतनगर येथील स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ) वाचक संघ होय.

Unforgiving Public Library ... | शुल्क न आकारणारे सर्वसामान्यांचे ग्रंथालय...

शुल्क न आकारणारे सर्वसामान्यांचे ग्रंथालय...


आमच्या ग्रंथालयात इतकी पुस्तके आहेत, एवढ्या नवीन आवृत्त्या आमच्या ग्रंथालयात येणार आहेत, अशी जाहिरातबाजी करण्यापेक्षा दर्जेदार पुस्तकांसह कोणाचाही मुक्त संचार असलेले ग्रंथालय म्हणजे दौलतनगर येथील स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ) वाचक संघ होय. ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारले जात नाही.
वाचन संस्कृती रुजविण्यासाठी येथील सुनील यळगूडकर यांनी आपल्या घरामध्ये वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणताही समारंभ न करता २५० पुस्तकांसह ग्रंथालय सुरू केले. ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर, वसंत जोशी, चंद्रकुमार नलगे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. मंगेश कश्यप, डॉ. जे. के. पवार, दीपक भागवत (प्रवचनकार), रजनी हिरळीकर, श्याम कुरळे, सुरेश शिपुरकर, कै. अमरसिंह राणे यांनी भेट देऊन ग्रंथालयासाठी मोलाची मदत केली आहे. - प्रदीप शिंदे

२५० पुस्तकांपासून सुरू केलेल्या ग्रंथालयात सध्या १२०० च्या आसपास दर्जेदार पुस्तके आहेत. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले असते. या ग्रंथालयात सभासद होण्यासाठी वयाची अट नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे हा ऐकमेव हेतू या ग्रंथालयांचा आहे.
- सुनील यळगूडकर

Web Title: Unforgiving Public Library ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.