प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:13+5:302021-07-14T04:27:13+5:30

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जिल्ह्यातील कामकाज गेले साडेतीन महिने बंद आहे. त्यामुळे माल व प्रवासी वाहनधारकांना असंख्य प्रश्न, ...

Undo Regional Transport Office | प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्ववत सुरू करा

प्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्ववत सुरू करा

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जिल्ह्यातील कामकाज गेले साडेतीन महिने बंद आहे. त्यामुळे माल व प्रवासी वाहनधारकांना असंख्य प्रश्न, समस्या, अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने आता हे कार्यालय पूर्ववत पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मंगळवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना दिले. या वेळी त्यांनी येत्या चार दिवसांत या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

कोरोना संसर्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज एप्रिल २०२१ पासून बंद आहे. त्यामुळे माल व प्रवासी वाहनधारकांचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. वाहन खरेदीपत्रावर नोंदणी प्रमाणपत्रावर नवीन वाहनधारकाची नोंद होणे, बॅंक व फायनान्स कंपनीचा बोजा नोंदणी प्रमाणपत्रावर नोंद होणेबाबत, माल व प्रवासी वाहनांचे पासिंग फिटनेसबाबत, वाहनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, आदी मागण्या शिष्टमंडळाद्वारे करण्यात आल्या. या शिष्टमंडळात कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ भोपळे, सचिव हेमंत डिसले, विजय पोवार, प्रकाश केसरकर, गोविंद पाटील आदींचा सहभाग होता.

फोटो नं. १३०७२०२१-कोल-आरटीओ

ओळ : माल व प्रवासी वाहनधारकांचे असंख्य प्रश्न रेंगाळल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरू करावे, या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना दिले.

130721\13kol_3_13072021_5.jpg

ओळ : माल व प्रवासी वाहनधारकांचे असंख्या प्रश्न रेंगाळल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्ववत पूर्णवेळ सुरु करावे या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या शिष्ठमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना दिले.

Web Title: Undo Regional Transport Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.