नागणवाडी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:50+5:302021-09-08T04:28:50+5:30

या मंडल कार्यालयाशी नागणवाडीसह, कोरज, कुर्तनवाडी, कोनेवाडी, गंधर्वगड, बेळेभाट, दाटे या गावांतील शेतकऱ्यांची सात-बारा, आठ अ, फेरफार उतारे, विद्यार्थ्यांना ...

Undo the office of Naganwadi Mandal Officer | नागणवाडी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय पूर्ववत सुरू करा

नागणवाडी मंडल अधिकाऱ्याचे कार्यालय पूर्ववत सुरू करा

Next

या मंडल कार्यालयाशी नागणवाडीसह, कोरज, कुर्तनवाडी, कोनेवाडी, गंधर्वगड, बेळेभाट, दाटे या गावांतील शेतकऱ्यांची सात-बारा, आठ अ, फेरफार उतारे, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्न दाखले यासाठी चंदगड येथे नेहमी ये-जा सुरू असते; मात्र नागणवाडीतील मंडल अधिकारी कार्यालय मिटिंगची कारणे पुढे करून आपले बस्तानच चंदगडला हलविले आहे. याबाबत अनेकांनी चौकशी केली असता, कोरोनाचे कारण पुढे केले जात आहे. त्यानंतर बदलीचेही कारण पुढे करण्यात आले. आता नवीन मंडल अधिकारी रूजू झाले आहेत. मात्र, हे अधिकारी तहसील कार्यालयाच्या व्हीसीमध्ये बसून असल्याचे सांगितले जात आहे. पण तिथेही गेल्यावर अधिकारी गैरहजर असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कामाअभावी रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अनेक योजना आपल्यादारी घेऊन शासनाचे अधिकारी येतात, अशी जाहिरातबाजी करत असतात. मात्र, याठिकाणी मात्र वेगळेच चित्र आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी बरेच निरक्षर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून एखादा कागद जोडायचा राहून जातो. त्याला मार्गदर्शन करण्याची गरज असताना त्याला निरुत्तर करून पाठविले जाते. त्यामुळे लवकरात लवकर मंडल अधिकाऱ्यांची नागणवाडी येथे नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Undo the office of Naganwadi Mandal Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.