शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

फलटण तालुक्यातील ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा; संबंधित वाळू तस्करांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:14 IST

फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा करीत आहेत.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष नदी, ओढे पात्रात खड्डे पडल्याने पर्यावरणप्रेमींतून नाराजी

जिंती : फलटण तालुक्यातील जिंती व साखरवाडी भागात वाळूमाफिया ओढे, नीरा नदीकाठ व शेतकरी महामंडळाच्या शेतातील अवैधपणे वाळूचा उपसा करीत असल्याचे उघडकीस येत आहे. वाळू चोरी होत असल्याबाबत तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतक-यांमधून केला जात आहे.

फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा करीत आहेत. तांबेवस्ती, बिरोबा मंदिराजवळ व जोशी वस्तीलगतच्या ओढ्यातून दिवसाढवळ्या व रात्री मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळूमाफियांकडून शेतकºयांना दमदाटी केली जाते.ओढ्याच्या पात्रांमधून दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे.

साखरवाडी भागात रात्रंदिवस हायवा व ट्रॉलीने वाळूची वाहतूक होत आहेत. वाळू उपशामुळे येथील परिसरातील रस्ते, ओढ्यालगतच्या शेतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित विभागांकडे तसेच तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. यामुळे यामध्ये मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महसूल, पाटबंधारे, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन एकमेकांकडे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्हाधिका-यांनी लक्ष घालण्याची गरजप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करी फोफावली आहे. याबाबत जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे. विविध भागातील ग्रामपंचायती किंवा संबंधित शेतकºयांच्याकडून अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या असतानाही महसूल विभागही डोळे असून आंधळ्याची भूमिका घेऊन बसले आहेत. यामुळे वाळूमाफियांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर वर्षभरापासून पेव फुटले आहे. नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsandवाळूThiefचोर