विकासासाठी ‘शरियत’चा गाभा समजून घ्यावा--हुमायून मुरसल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:53 IST2017-09-22T00:52:07+5:302017-09-22T00:53:43+5:30

कोल्हापूर : मुस्लिम बांधव-भगिनींनी विकास साधण्यासाठी शरियत कायद्याचा गाभा समजून घ्यावा,

 Understand the power of 'Sharia' for development - Humayun Murshal | विकासासाठी ‘शरियत’चा गाभा समजून घ्यावा--हुमायून मुरसल

विकासासाठी ‘शरियत’चा गाभा समजून घ्यावा--हुमायून मुरसल

ठळक मुद्देहिंदी हैं हम... ‘हिंदोस्ताँ हमारा’तर्फे व्याख्यान; मानवी हस्तक्षेपामुळे शरियत कायद्यात दोषक्रांतिकारी कार्य प्रत्यक्षात आणणाºया इस्लाममध्ये आजच्या समस्यांना भिडण्याचे सामर्थ्य

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुस्लिम बांधव-भगिनींनी विकास साधण्यासाठी शरियत कायद्याचा गाभा समजून घ्यावा, असे आवाहन ‘हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा’ या संस्थेचे कार्याध्यक्ष हुमायून मुरसल यांनी बुधवारी येथे केले.

येथील ‘हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा’ आणि ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ या संस्थांतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘सर्वोच्च न्यायालयाचा तलाक निर्णय आणि मुस्लिम स्त्रियांची दु:खमुक्ती’ असा व्याख्यानाचा विषय होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सलाउद्दीन ठाकूर होते.

हुमायून मुरसल म्हणाले, या कायद्यामध्ये आज जे दोष दिसत आहेत, त्यांचे कारण मानवी हस्तक्षेप हा आहे. हे दोष दूर करण्यासह विकास साधण्यासाठी मुस्लिम बांधव-भगिनींनी शरियत कायद्याचा गाभा समजून घ्यावा. इस्लाममध्ये स्त्रियांना पुरुषसत्ताकतेतून मुक्त करून एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बहाल केले. तिला पुरुषांच्या जाचातून मुक्तीचा मार्ग मिळत नव्हता. त्यांना तलाक व पुनर्विवाहाचा अधिकार देऊन पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देण्यात आला. इतके क्रांतिकारी कार्य प्रत्यक्षात आणणाºया इस्लाममध्ये आजच्या समस्यांना भिडण्याचे सामर्थ्य आहे. त्यासाठी इस्लामचा विकास, इस्लामच्या कायदेशास्त्राचा अभ्यास मुस्लिम बांधव-भगिनींनी करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात सेंटर फॉर रेनेसाँचे अध्यक्ष हाशीम मनगोळी, दस्तगीर मोमीन, रोझा किणीकर, मल्लिका शेख, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी सईदा सुतार, मुनीरभाई पटवेकर, भाईजान देसाई, सलीम पटवेगार, बशीर पठाण, मुन्ना पठाण, मेहबूब बोजगर, शौकत जमादार, आदी उपस्थित होते. पन्हाळ्याच्या नगरसेविका यास्मिन मुजावर यांनी प्रास्ताविक केले. समीर बागवान यांनी स्वागत केले. इम्तियाज नदाफ यांनी आभार मानले.

सहा महिन्यांत सेंटर कार्यान्वित होणार
हेर्ले या ठिकाणी ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ सुरू केले जाणार आहे. हे सेंटर परिवर्तनाचे प्रमुख जबाबदारी निभावणार आहे. यामध्ये स्त्री-सशक्तीकरणाचा एक विभाग असणार आहे. या सेंटरतर्फे पर्यावरण, आरोग्य याबाबत काही उपक्रम लवकरच सुरू केले जाणार आहेत. सहा महिन्यांत सेंटर कार्यान्वित होईल, असे कार्याध्यक्ष हुमायून मुरसल यांनी सांगितले.

Web Title:  Understand the power of 'Sharia' for development - Humayun Murshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.