शेंडा पार्क ते वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वाहिनी महावितरण : कोल्हापूर शहराच्या वीजपुरवठ्याचे सक्षमीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:23 IST2021-05-09T04:23:54+5:302021-05-09T04:23:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महावितरणतर्फे शेंडा पार्क व वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले ...

Underground channels between Shenda Park to YP Powarnagar sub-station MSEDCL: Empowerment of Kolhapur city power supply | शेंडा पार्क ते वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वाहिनी महावितरण : कोल्हापूर शहराच्या वीजपुरवठ्याचे सक्षमीकरण

शेंडा पार्क ते वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वाहिनी महावितरण : कोल्हापूर शहराच्या वीजपुरवठ्याचे सक्षमीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महावितरणतर्फे शेंडा पार्क व वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, ही वीज वाहिनी कार्यान्वित करून नुकताच वीजपुरवठा यशस्वीरीत्या सुरू करण्यात आला आहे. महावितरणकडून चार दिवसांच्या अल्प कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील आहे. कोल्हापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आता कोल्हापूर शहराचा वीजपुरवठा पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे. महावितरणकडून कोल्हापूर शहरातील वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, या हेतूने शेंडा पार्क व वायपी पोवारनगर या दोन उपकेंद्रांना जोडणारी ३३ केव्ही गोकुळ शिरगाव उच्चदाब वीज वाहिनी भारतनगर झोपडपट्टीतून जात होती. ती धोकादायक स्थितीत होती. त्यामुळे पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या २० लाख रुपये निधीतून या दोन उपकेंद्रादरम्यान ५०० मीटर अंतराची भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात आली. या भूमिगत वीज वाहिनीमुळे शाहू मिल, शिवाजी विद्यापीठ, घाटगे पाटील, वाय.पी. पोवारनगर या चार उपकेंद्रांना रिंग फिडरची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराचा वीजपुरवठा सक्षम झाला आहे. कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे व कार्यकारी अभियंता डॉ. नामदेव गांधले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अजित अस्वले, उपविभागीय अभियंता सचिन पाटील, सहायक अभियंता रवींद्र खोत, प्रशांत सासणे यांनी कामकाज पाहिले.

०८०५२०२१-कोल-महावितरण

कोल्हापुरात महावितरणतर्फे शेंडा पार्क व वायपी पोवारनगर उपकेंद्रादरम्यान भूमिगत वीज वाहिनीचे काम चार दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे.

Web Title: Underground channels between Shenda Park to YP Powarnagar sub-station MSEDCL: Empowerment of Kolhapur city power supply