शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पंचायत समितीला मिळाली तब्बल१६ लाखांची बक्षिसे!, 'यशवंत पंचायतराज'मध्ये हॅट्रिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 11:48 IST

राम मगदूम  गडहिंग्लज(जि. कोल्हापूर ) यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत २०२०-२१ व २०२२-२३ या दोन्ही वर्षी झालेल्या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत ...

राम मगदूम गडहिंग्लज(जि.कोल्हापूर) यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत २०२०-२१ व २०२२-२३ या दोन्ही वर्षी झालेल्या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत समितीने पुणे विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. दोन्ही वर्षात मिळून तब्बल १६ लाखांची बक्षिसे मिळाली.सलग दोन्ही स्पर्धेत यश मिळवणारी गडहिंग्लज ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती असून या स्पर्धेतील यशाचे ही हॅट्रिक आहे.शुक्रवारी (१ मार्च) पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गडहिंग्लज पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी शरद मगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी उपायुक्त विजय मुळीक, राहुल साकोरे,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याश्मी नागराजन यांची प्रमुख उपस्थिती होती.पंचायत समितीच्या सर्व विभागांचे उत्कृष्ट कामकाज,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शून्य प्रलंबिततालोकाभिमुख प्रशासन व जनतेला दिली जाणारी सेवा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची बांधिलकी, तंत्रज्ञानाचा वापर,अभिलेख वर्गीकरण, लेखा परीक्षण  आदीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला.गडहिंग्लज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत)राजन  दड्डीकर , पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता मयंक कुरुंदवाडकर,  विस्तार अधिकारी(आरोग्य)अमर निंबाळकर, भडगावचे ग्रामसेवक राजेंद्र गवळी, हरळीचे ग्रामसेवक संदीप आदमापूरे आदी उपस्थित होते.

वर्षात ४९ लाखांची बक्षिसे!२०२०-२१ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाअंतर्गत राज्यातील अव्वल पंचायत समितीचा २५ लाखांचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळाला.त्यानंतर यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत सलग तिसऱ्यांदा पुणे विभागात दुसरा क्रमांकाचे प्रत्येकी ८ लाखांचे मिळून २४ लाखांची बक्षिसे मिळाली.गटविकास अधिकारी शरद मगर यांच्या कारकीर्दीत हे यश मिळाले आहे.वर्षात मिळून तब्बल ४९ लाखांची बक्षिसे मिळवणारी गडहिंग्लज पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर