उंदरवाडीत मंडलिक, संजय घाटगे गटाची युती तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:59 AM2021-01-13T04:59:59+5:302021-01-13T04:59:59+5:30

बोरवडे : (रमेश वारके) उंदरवाडी (ता. कागल) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मंडलिक व संजयबाबा घाटगे गटाची २० वर्षांपासून असलेली ...

In Undarwadi, the alliance of Mandlik and Sanjay Ghatge groups was broken | उंदरवाडीत मंडलिक, संजय घाटगे गटाची युती तुटली

उंदरवाडीत मंडलिक, संजय घाटगे गटाची युती तुटली

Next

बोरवडे : (रमेश वारके) उंदरवाडी (ता. कागल) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मंडलिक व संजयबाबा घाटगे गटाची २० वर्षांपासून असलेली युती तुटली असून, समरजित घाटगे आणि मुरगूडकर-पाटील गटाला फुटीरतेचे ग्रहण लागले आहे. २००५ ते २०१५ सालापर्यंत बिनविरोध निवडणूक झालेल्या उंदरवाडीची यावेळी अटीतटीची लढत होत आहे.

उंदरवाडी हे कागल तालुक्यातील शेवटचे गाव ! येथील राजकारण नेहमीच संवेदनशील राहिले आहे. या निवडणुकीत मंडलिक व समरजित घाटगे गटाची युती असून त्यांंच्याविरोधात हसन मुश्रीफ, संजयबाबा घाटगे, समरजित घाटगे व मुरगूडकर-पाटील गटाच्या युतीने आव्हान उभे केले आहे. दोन्ही गटांनी विद्यमान उमेदवारांना संधी नाकारली असून तीन प्रभाग असलेल्या या गावात नऊ जागांसाठी साताप्पा सीताराम पाटील या अपक्षासह १९ उमेदवार रिंगणात आहेत; तर एकूण दोन हजार मतदार आहेत. गेली अनेक वर्षे येथे मंडलिक गटाचेच वर्चस्व राहिले असून, या निवडणुकीत संजय घाटगे गटाने मंडलिक गटाशी फारकत घेतल्याने मंडलिक गट आपल्या वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहे. स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व मंडलिक साखर कारखान्याचे संचालक मसू पाटील, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, विष्णू पाटील, समरजित घाटगे गटाचे पांडुरंग लक्ष्मण पाटील व पाटील गटाचे रघुनाथ पाटील हे करीत आहेत; तर विरोधी बेलजाई परिवर्तन महाविकास आघाडीचे नेतृत्व मुश्रीफ गटाचे संजय पाटील, मारुती पाटील, संजयबाबा घाटगे गटाचे साताप्पा पाटील, दिनकर पाटील, समरजित घाटगे गटाचे आकाराम पाटील करीत आहेत.

..........................

चौकट

समरजित घाटगे व पाटील गटाला फुटीरतेची किनार मिळाली असून समरजित घाटगे गटाचे दोन्ही पॕनेलमध्ये उमेदवार उभे आहेत; तर मुरगूडकर-पाटील गटाचीही हीच अवस्था असून पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण पाटील व रणजित पाटील यांच्या नावांचा उल्लेख न करता ‘विश्वनाथअण्णा पाटील गट’ म्हणून पाटील गटाने सावध भूमिका घेतली आहे.

Web Title: In Undarwadi, the alliance of Mandlik and Sanjay Ghatge groups was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.