दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्तपणा

By Admin | Updated: November 13, 2014 00:41 IST2014-11-13T00:36:11+5:302014-11-13T00:41:28+5:30

जिल्हाधिकारी संतापले : वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर उपस्थित नव्हते

Unconditional Dattawad Rural Hospital | दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्तपणा

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्तपणा

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेबाबत नेहमी वादात असते. त्यात आणखी एका नव्या संकटात सापडले आहे. ग्रामस्थ व रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अचानक सोमवारी रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर नसल्याचे आढळले. रुग्ण व ग्रामस्थांच्या तक्रारींबरोबरच डॉक्टरांचा बेशिस्तपणा पाहून जिल्हाधिकारीच संतापले अन् शुक्रवारी (दि. १४) बैठक घेऊन अहवाल देण्याचे आदेश शिरोळ तहसीलदारांना दिले आहेत.
दत्तवाड येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग, अधीक्षक, डॉक्टरांची वारंवार अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा, सुविधांची वाणवा, बेशिस्तपणा, जबाबदारी झटकण्याची डॉक्टरांची भूमिकेमुळे रुग्णालयात रुग्णांचीच हेळसांड होत आहे. सुविधा असूनही रुग्णांना सेवा मिळत नसल्याने शिवसनेने वारंवार आंदोलन करून प्रशासनाला जागे केले. बेशिस्तपणामुळे रुग्णांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी माने यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर रुग्णालयात नव्हते. जिल्हाधिकारी चांगलेच भडकले. शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे, उपाध्यक्ष बाळासाहेब कोकण आदींनी रुग्णालयाच्या समस्या
मांडल्या. (वार्ताहर)

Web Title: Unconditional Dattawad Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.