शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन सुरू-कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 16:39 IST

प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही.

ठळक मुद्देमुंबईतील आझाद मैदानावर धरणेपावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी २० टक्के अनुदानपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार

कोल्हापूर : प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही. याबाबत सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवारपासून शाळा बंद आंदोलन सुरू झाले. त्यासह समितीने मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी २० टक्के अनुदानपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधींसह घोषित करण्याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन शासनाने पाळावे आणि हजारो शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, अशी अपेक्षा होती; परंतु, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सोमवारी सुरू केले. त्यात राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक हे शाळा बंद ठेवून सहभागी झाले. दिवाळीच्या सुट्टीनंतर सोमवारपासून या शाळा सुरू होणार होत्या; मात्र, या आंदोलनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा सुट्टी मिळाली आहे. इयत्ता दहावी आणि शिष्यवृत्तीचे जादा तासदेखील या आंदोलनाअंतर्गत बंद करण्यात आले आहेत. 

या आंदोलनात राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले आहेत. मुंबईतील आंदोलनात कोल्हापूरमधील सुमारे ३00 शिक्षक सहभागी झाले आहेत. त्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील ११६ शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शहरातील ४० आणि ग्रामीण भागातील ७६ शाळांचा समावेश आहे. मागण्यांबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक कार्यवाही होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.- खंडेराव जगदाळे, उपाध्यक्ष, राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकStrikeसंपkolhapurकोल्हापूर