शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Kolhapur: निधी खर्चाचा मुद्दा अधिवेशनात, पन्हाळा तालुक्यात झाले विनापरवाना वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:59 IST

कोल्हापूर : प्रशासक काळामध्ये वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे अधिकारच नसताना पन्हाळा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुभाष सावंत ...

कोल्हापूर : प्रशासक काळामध्ये वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे अधिकारच नसताना पन्हाळा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा मुद्दा नागपूर अधिवेशनामध्ये उपस्थित होणार आहे. काॅंग्रेसचे आमदार राजू आवळे यांनी हा प्रश्न उपस्थित केला असून तो चर्चेला येण्याची शक्यता आहे.ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक आहे तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी वित्त आयोगाचा निधी खर्च करू नये, असे स्पष्टपणे शासनाने कळवले होते. मात्र, सावंत यांनी सन २०२२/२३ मध्ये बंधित व अबंधित अशा ३ कोटी ८६ लाख १० हजार रुपयांच्या १३७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. ७ लाख रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली. ९ लाख रुपयांच्या चार कामांचे कार्यारंभ आदेशही दिले तर साडेपाच लाख रुपयांची देयकेही अदा केली आहेत.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशीतच वरील बाबी स्पष्ट झाल्या. यानंतर सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.आता हे प्रकरण अधिवेशनात येणार असून, याबाबतचे सविस्तर उत्तर जिल्हा परिषदेने पाठवून दिले आहे. या प्रकरणावरून धडा उर्वरित ११ तालुक्यांतील वित्त आयोगाचे दप्तर तपासणीचे आदेश संतोष पाटील यांनी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागात ही दप्तर तपासणी पूर्ण झाली असून, यातील त्रुटींचे संकलन करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर