उमेश साटम यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:49+5:302021-07-11T04:17:49+5:30
कोल्हापूर : शाहूपुरीतील उमेश परशुराम साटम (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा ...

उमेश साटम यांचे निधन
कोल्हापूर : शाहूपुरीतील उमेश परशुराम साटम (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
चंपाबाई घाटगे
कोल्हापूर : नेज शिवपुरी (ता. हातकणंगले) येथील चंपाबाई शांतू घाटगे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चेतन घाटगे यांच्या त्या आजी होत.
विठ्ठल माने
कोल्हापूर : सदर बाजारातील सेवानिवृत्त जवान विठ्ठल गोविंद माने (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
प्रकाश साळोखे
कोल्हापूर : संभाजीनगर निर्माण चौक, ताराराणी काॅलनीतील प्रकाश ऊर्फ कृष्णराव बापूसाहेब साळोखे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
कमलाकर बनगे
कोल्हापूर : सिद्धार्थनगरातील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर ज्ञानदेव बनगे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.