उजळाईवाडीच्या रेहानचा अभिनयच भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST2020-12-17T04:48:01+5:302020-12-17T04:48:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उचगाव : आपल्या अमोघ वाणीने रसिकांना भुरळ घालणाऱ्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रेहान शकील नदाफ ...

उजळाईवाडीच्या रेहानचा अभिनयच भारी
लोकमत न्यूज नेटवर्क
उचगाव : आपल्या अमोघ वाणीने रसिकांना भुरळ घालणाऱ्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील रेहान शकील नदाफ या बालचिमुकल्याने दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. या मालिकेत जोतिबाचा मित्र नीळकंठ भैरवची भूमिका दमदारपणे निभावत रेहानने प्रेक्षकांची वाहवा मिळविली आहे. या आधीही त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक व्यासपीठ गाजवली आहेत. शिवाय अभिनय क्षेत्रातही अनेक राज्यस्तरीय, एक इंटरनॅशनल पुरस्कार, एक नॅशनल पुरस्कार असे २१० पुरस्कार त्याने पटकाविले आहेत. महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर या हिंदी सिरियलमध्ये त्याने काम केले आहे. यापूर्वी तो कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा ब्रँड ॲम्बॅसडर होता. अभिनय क्षेत्रामध्ये रेहानला विजय पाटकर, जयवंत वाडकर, माधुरी पाटकर, अमेय हिंदळकर या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले आहे.