उजळाईवाडी वाहतूक शाखेचे उपक्रम दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST2021-09-18T04:24:49+5:302021-09-18T04:24:49+5:30
उचगाव : देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रात चालकांचे योगदान असून, उजळाईवाडी वाहतूक शाखेने चालकांसाठी राबविलेला उपक्रम दिशादर्शक ...

उजळाईवाडी वाहतूक शाखेचे उपक्रम दिशादर्शक
उचगाव : देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रात चालकांचे योगदान असून, उजळाईवाडी वाहतूक शाखेने चालकांसाठी राबविलेला उपक्रम दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी केले.
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्यावतीने शुक्रवारी वाहन चालक दिनाच्या निमित्ताने चालकांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पाटील बोलत होते. कोल्हापूर जिल्हा लॉरी असोसिएशनचे १५ वाहनचालक, एसटी आगाराचे १५, महामार्ग मेंटन्स विभागाचे ४ वाहन, तर इतर संघटनेचे २५ वाहनचालकांना विना अपघात वाहतूक सेवा बजावल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. यात वाहनचालकाची नेत्र व हृदयविकार तपासणी, ऐच्छिक एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यावेळी उजळाईवाडी महामार्ग पोलीस केंद्रातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेडगे, सहायक पोलीस निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिरगुप्पी, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, शंकर कोळी, लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, डॉ. राहुल चोगुले, डॉ. आरती भोसले उपस्थित होते.
फोटो १७ उजळाईवाडी सत्कार
उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने वाहनचालक दिन कार्यक्रमात करवीर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांचा सत्कार सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेडगे यांनी केला.