उडपीचा सोनेश्वर ‘कर्नाटक श्री’

By Admin | Updated: April 5, 2016 23:58 IST2016-04-05T23:58:53+5:302016-04-05T23:58:53+5:30

निपाणी शरीरसौष्ठव स्पर्धा : राजू हिग्लजे ‘निपाणी श्री’

Udupi Sonashwar 'Karnatak Shree' | उडपीचा सोनेश्वर ‘कर्नाटक श्री’

उडपीचा सोनेश्वर ‘कर्नाटक श्री’

निपाणी : जोल्ले उद्योग समूह व निपाणी शरीरसौष्ठव संघटनेतर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘कर्नाटक श्री’चा बहुमान उडपीच्या लेवीन सोनेश्वर यांनी पटकाविला. त्यांना रोख ५० हजार रुपये, शिल्ड व प्रशस्तिपत्र आशाज्योती गतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते देण्यात आले. उपविजेता म्हणून शौकत अली याला २५ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रशस्तिपत्र, तर बेन्ट पोझचा पुरस्कार राजकुमार दुरगडे (बेळगाव) यांना ५ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रशस्तिपत्र देण्यात आले. या सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
‘निपाणी श्री’चा बहुमान राजू हिग्लजे यांनी पटकाविला, तर बेस्ट पोझचा पुरस्कार आशिष भाट यांना देण्यात आला. अन्य निपाणी ‘टॉपटेन श्री’ आदित्य श्रीपण्णावर, करण देसूरकर, शिवप्रसाद केसरकर, सर्फराज अत्तार, किशोर मकवान, प्रेम गिरी, संदीप पाटील, माणिक घाटगे, आशिष भाट यांनी पटकाविला.
८५ किलो गटावरील स्पर्धेत लेविन सोनेश्वर, लिजो जॉन, अनिल किल्लेदार, चेतन के. एन., शरथकुमार बी. एन., ८५ किलो वजन गटात शौकत अली, संदीपकुमार एस., दीपक बन्स, रोहित चव्हाण, प्रसाद जाधव, ८० किलो वजनी गटात नित्यानंद कोटीन, राहुल कोळेकर, विक्रांत सातवेकर, रोमिओ धनट्टी, गजानन कीर्तीकर, ७५ किलो वजन गटात प्रशांत कन्नूरकर, जिलानी सरिमन शालूगडे, दयानंद निलजगेकर, पृथ्वीराज कणगलेकर यांनी यश मिळविले. ७० किलो वजन गटात आनंद डी., प्रताप कालकुद्रीकर, प्रवीण मजूकर, अतिश पावशे, संतोष तळवार, ६५ किलो वजन गटात तानाजी चौगुले, राजू हिग्लजे, भानूप्रसाद, सदाकउल्ला, युवराज राक्षे, ६० किलो वजन गटात विकास शाहपूरकर, दर्शन पाटील, उमेश कंगणे, जितेश पाटील, सोमशेखर, ५५ किलो वजन गटात गजानन कांबळे, मणिकांत मुईश्वर, राजकुमार दुरुगडे, युवराज पाटील, इस्माईल बेफारी यांनी क्रमांक पटकाविले. (प्रतिनिधी)

Web Title: Udupi Sonashwar 'Karnatak Shree'