वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुकीने उदगावकर सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:41+5:302021-07-08T04:16:41+5:30
: वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुकीने उदगावकर सुखावले उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील बसस्थानकावर एसटी बसेसची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नियंत्रकाची ...

वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुकीने उदगावकर सुखावले
: वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुकीने उदगावकर सुखावले
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील बसस्थानकावर एसटी बसेसची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस या स्थानकावर बस थांबत नसल्याची तक्रार असणाऱ्या प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
उदगाव येथील प्रवाशांची संख्या साधारणत: अडीच हजार इतकी आहे. तरीही लाल फलक असलेल्या व साधारण लांब पल्ल्याच्या बसेस थांबत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार होती. कोरोनाच्या कारणास्तव गेले वर्षभर एस. टी. बसेसच्या फेऱ्याही थांबल्या होत्या. गेल्या महिन्यापासून ही सेवा सुरू झाली आहे. परंतु प्रवाशी शासकीय वाहतुकीपेक्षा खासगी वाहतूक करत आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीला ब्रेक लागला आहे. अशा परिस्थितीत महसूल वाढीसाठी कुरुंदवाड आगार प्रयत्न करत आहे. प्रवाशांचे समुपदेशन व थांब्यावर बस थांबवून त्यांची सोय करणे, ये-जा करणाऱ्या बसेसची नोंद घेणे हे काम त्याठिकाणच्या नियंत्रकाचे आहे. एकंदरीत बसस्थानकावर बस थांबत नाही, ही गावकऱ्यांची गेले कित्येक वर्षाची मागणी आता या योजनेमुळे तरी पूर्ण होताना दिसत आहे.
-----------
कोट - उदगाव येथे गेले कित्येक वर्षे विद्यार्थी व ग्रामस्थांनी बस थांबत नाही म्हणून आंदोलने केली आहेत. वाहतूक नियंत्रकाच्या नेमणुकीमुळे सर्व बसेस येथे थांबत आहेत. त्यामुळे कुरुंदवाड आगाराचा हा कौतुकास्पद निर्णय आहे.
रमेश मगदूम, उपसरपंच उदगाव
-----------
फोटो - ०७०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळी - उदगाव (ता. शिरोळ) येथील बसस्थानकावर वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. (छाया- अजित चौगुले, उदगाव)