उदगावचे कोरोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:23 IST2021-04-11T04:23:22+5:302021-04-11T04:23:22+5:30
शिरोळ तालुक्यातील पहिलेच कोरोना सेंटर उदगाव येथील कुंजवन येथे होत आहे. या ठिकाणी १२५ बेड उपलब्ध होणार असून या ...

उदगावचे कोरोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होणार
शिरोळ तालुक्यातील पहिलेच कोरोना सेंटर उदगाव येथील कुंजवन येथे होत आहे. या ठिकाणी १२५ बेड उपलब्ध होणार असून या ठिकाणी स्वॅब तपासणी केंद्रही सुरू होणार असल्याचे सीईओ माने यांनी सांगितले. तालुक्यासह या परिसरातील सर्वांनाच याचा लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही सोई-सुविधांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार, विस्तार अधिकारी महाडिक, डॉ. एस. टी. कंदले, सरपंच कलिमून नदाफ, पोलीस पाटील अनुराधा कांबळे, राजू मगदूम, रामचंद्र बंडगर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
-----------
स्थानिकांना बेड राखीव ठेवावेत
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात कुंजवन केंद्राने मोठी मदत केली आहे त्यावेळी ग्रामस्थांना बेड मिळणे मुश्कील झाले होते. स्थानिक रुग्णांना या ठिकाणी काही बेड राखून ठेवण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी यांनी यावेळी केली.
फोटो
उदगाव कुंजवन कोरोना सेंटरला भेट देऊन पाहणी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने यांनी केली. यावेळी डॉ. योगेश साळी, डॉ. प्रसाद दातार आदी उपस्थित होते.
छाया अजित चौगुले. उदगाव