शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

शिवाजी पुतळा सुशोभीकरणाचे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:28 IST

शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवाजी पुतळा सुशोभीकरणाचे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटनशेतकऱ्यांना दुभत्या जनावरांचे वाटप

कोल्हापूर : शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता विमानाने मुंबईहून कोल्हापुरात येणार आहेत. पहिल्यांदा ते अंबाबाईचे दर्शन घेणार असून, त्यानंतर विद्यापीठ हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. तेथून शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी पुरात पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील ३00 घरांची अंशत: व पूर्णपणे पडझड झाली आहे, त्यांना माझ्यावतीने १0 हजार रुपये मदतीचे वाटप करणार आहे. तेथून ते शाहूवाडी येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.

फ्लॅटधारकांनाही नुकसानभरपाई मिळणारपुराचे पाणी आलेल्या अपार्टमेंटमधील सर्वच कुटुंबांना सांगलीमध्ये नुकसानभरपाई देण्यात आली; पण येथे देणार नसल्याचे समजले, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून, सांगलीप्रमाणे येथेही मदत देऊ व व्यापाऱ्यांनाही दोन दिवसांत ५० हजारांप्रमाणे नुकसानभरपाई देऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKolhapur Floodकोल्हापूर पूर