शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सभा मार्गावर उद्धव ठाकरे यांचे बॅनर, कोल्हापुरात शिवसेनेत रंगली ईर्षा 

By विश्वास पाटील | Updated: February 17, 2024 13:51 IST

कोल्हापूर : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी ...

कोल्हापूर : शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदानात होणार असून त्या मार्गावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर झळकल्याने तो शहरात चांगलाच चर्चेचा विषय झाला. त्यानिमित्याने दोन्ही शिवसेनेतील चूरस आणि खू्न्नसही पाहायला मिळत आहे. ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही बॅनर लावली. त्यातून तणाव होवू नये म्हणून पोलिसांनी त्यातील दोन बॅनर काढली तरी अजूनही दोन बॅनर झळकत आहेत. ठाकरे यांच्या बॅनरला विरोधक भ्याले अशी प्रतिक्रिया इंगवले यांनी व्यक्त केली आहे.स्थानिक राजकारणात इंगवले व शिंदे शिवसेनेचे कोल्हापूरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांच्या गेल्या दोन वर्षापासून कमालीचा राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवसेना एकत्रित असताना इंगवले यांना शहरप्रमुख पदावरून दूर केल्याचे निमित्त झाले व तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता क्षीरसागर यांच्या प्रत्येक कृत्याला इंगवले जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. इंगवले हे मुळचे शिवाजी पेठेतील असल्याने त्यांच्याकडे संघटनेशिवाय स्वत:चीही तरुणांची फळी आहे. जे पटत नाही त्यावर रोखठोक व्हिडीओ करून सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची त्यांची पध्दत आहे. त्यांचे कार्यालय खरी कॉर्नर परिसरात आहे. त्याच मार्गावरून मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी कार्यकर्ते जाणार आहेत. तेच हेरून इंगवले यांनी कार्यालयाच्या भिंतीवर ठाकरे यांचे मोठे बॅनर लावले. सत्तापिपासूंना वाटत असेल मोठे नेते फोडले म्हणजे मैदान मोकळे आहे, पण लक्षात ठेवा महाराष्ट्रात गवतालाही भाले फुटतात अशी पोस्ट त्यांनी या बॅनरसोबत व्हायरल केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण