शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी; कोल्हापुरात उद्या शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 18:56 IST

कोल्हापुरातील जनता, शिवसैनिक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेशच दिला जाणार

कोल्हापूर : उद्धव साहेब, तुम्हीच आमचे कुटुंबप्रमुख, आम्ही तुमच्या पाठीशी... असे म्हणत आज कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणारी पदयात्रा शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संघर्षाची धार तीव्र होणार आहे.शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या पदयात्रेत खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यासह कट्टर शिवसैनिक सहभागी होणार आहेत.शिवसेना आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. राज्यपातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. याचवेळी काल, बुधवारी सायंकाळी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी, संघर्षास तयार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिकही पेटून उठले आहेत. जागोजागी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने सुरू केली आहेत. कोल्हापुरातही उद्या, शुक्रवारी आंदोलन केले जाणार आहे. यानिमित्ताने कोल्हापुरातील जनता, शिवसैनिक मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेशच दिला जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना