उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती अत्यावस्थ

By Admin | Updated: November 14, 2014 00:44 IST2014-11-14T00:44:26+5:302014-11-14T00:44:45+5:30

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक बनली

Udayasinghrao Gaikwad's condition is immediate | उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती अत्यावस्थ

उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती अत्यावस्थ

कोल्हापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक बनली असून त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती खालावली असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, गायकवाड यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालय तसेच ताराबाई पार्क येथील निवासस्थानी भेट देऊन विचारपूस केली.
लोकसभेत पंचवीस वर्षे कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केलेल्या उदयसिंगराव गायकवाड यांना मंगळवारी कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या दोन्ही किडनी नीट काम करत नसल्याने डायलेसिसचे नियमीत उपचार सुरु आहेत. पण अनपेक्षितपणे रक्तदाबही कमी झाला. त्याचबरोबर लघवीत व फुप्फुसाला जंतूसंसर्ग झाला आहे. आज त्यांची प्रकृती थोडी अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना आता कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला आहे. दिवसभरात त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळे प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. डॉ. साईप्रसाद, डॉ. प्रकाश शाडबिद्री, डॉ. श्रीधर पाटील हे उपचार करीत आहेत.

Web Title: Udayasinghrao Gaikwad's condition is immediate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.