शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर हद्दवाढ: उचगाव ग्रामस्थांचा तीव्र विरोध, गावातील सर्व व्यवहार ठेवले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 16:22 IST

गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला.

मोहन सातपुतेउचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील ग्रामस्थांनी हद्दवाढीला तीव्र विरोध दर्शवत आज, सोमवारी गाव बंदची हाक देत सर्व व्यवहार बंद ठेवले. आमच्या गावात आमचंच सरकार, हद्दवाढीस उचगाव ग्रामस्थांचा तीव्र इन्कार, असे म्हणत गाव बंद ठेवले.उचगाव येथील हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने आज उचगाव बंद करण्याची हाक देण्यात आली होती. या अनुषंगाने उचगाव हद्द वाढविरोधी कृती समितीने ग्रामपंचायत कमानी जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ एकत्र येत गाव बंद ठेवून एकजुटीने हद्दवाढीला विरोध दर्शविला.यावेळी कृती समिती सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर महानगरपालिका आपल्या नागरिकांना सेवा देण्यात अपयशी ठरली आहे. हद्दीतील गावांचा समावेश करून कर वसूल करण्याचे मनसूबे रचत आहे. परंतु हद्दवाडीमध्ये उचगावला समाविष्ट करू नये. उचगाव कधीही हद्दवाढीमध्ये समाविष्ट होणार नाही असा निश्चय करत हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी गाव बंद करुन हद्दवाढ विरोधात एल्गार पुकारला. नागरिकाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन गांधीनगर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी हद्दवाढ विरोधी कृती समिती अभिजीत पाटील, विक्रम चौगुले, अजित पाटील, शरद चव्हाण, गोगा पाटील, अभिजीत कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर महापालिकेने पहिला उपनगरांचा विकास करावा. त्यांना पहिल्या सुखसोयी द्याव्यात. गावाचा विकास करायला महानगरपालिकेचा कर ग्रामीण जनतेला न सोसनारा आहे. शेती व्यवसाय त्याचबरोबर शेतीवर अवलंबून असणारा दुग्धव्यवसाय हद्दवाढीमुळे धोक्यात येवू शकतो. - अभिजीत पाटील, मनसे, करवीर तालुका अध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूर