मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By Admin | Updated: March 25, 2017 00:05 IST2017-03-25T00:05:47+5:302017-03-25T00:05:47+5:30

सोनाळीतील प्रकार : निवृत्ती साळवीला अटक

Tyranny on the headmistress | मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

कोल्हापूर : सोनाळी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सातवीतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याच्या संशयावरून मुख्याध्यापकास करवीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. संशयित निवृत्ती दिनकर साळवी (वय ५५, रा. बाचणी, ता. कागल) असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
सोनाळी येथील प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल जानेवारीमध्ये रत्नागिरी, मार्लेश्वर, पावस येथे दोन दिवसांसाठी गेली होती. यावेळी पीडित मुलगी एस. टी. बसमध्ये ज्या ठिकाणी बसली होती, त्या ठिकाणी मुख्याध्यापक साळवी बसला. त्याने प्रवासात अंधाराचा फायदा घेत तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकारानंतर मुलगी घाबरली. साळवी याने कोणालाही सांगू नकोस अन्यथा शाळेतून काढून टाकून बदनामीची धमकी दिली. सहलीवरून परत आल्यानंतर शाळेत तीन वेळा साळवी याने कार्यालयात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे व संभाषण केले. सततच्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरली होती.
शुक्रवारी सकाळी पीडित मुलगी शाळेला आल्यानंतर मुख्याध्यापक सावळी याने पुन्हा तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोध करीत ती घरी धावत आली. मुखाध्यापक साळवी आपल्यावर अत्याचार करीत असल्याचे तिने थेट आई-वडिलांना सांगत अश्रू ढाळले. त्यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांना हा प्रकार सांगितला. पोलिस हवालदार तात्या मुंडे यांनी मुलीचा जबाब घेऊन साळवीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)



साळवीचे दबावतंत्र
संशयित मुखाध्यापक साळवी याने हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलिसांसह पीडित मुलीच्या वडिलांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Tyranny on the headmistress