शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पंचगंगा नदीच्या पुरातून दोन युवक वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:42 AM

कोल्हापूर : शिवाजी पूल, पंचगंगा घाट येथे रविवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेले दोन युवक पुराच्या पाण्यातून वाहून गेले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबवूनही त्यांचा मृतदेह मिळून आले नाहीत. वाहून गेलेल्यांपैकी एकाचे नाव सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ) ...

कोल्हापूर : शिवाजी पूल, पंचगंगा घाट येथे रविवारी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेले दोन युवक पुराच्या पाण्यातून वाहून गेले. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबवूनही त्यांचा मृतदेह मिळून आले नाहीत. वाहून गेलेल्यांपैकी एकाचे नाव सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ) असे आहे. दुसऱ्या युवकाचे नाव, पत्ता समजू शकलेला नाही. पंचगंगा नदीला पूर आल्याने शिवाजी पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुलावरून वाहनांची ये-जा सुरू होती. तोरस्कर चौकाकडून तीस वर्षांचा युवक धावत जुन्या शिवाजी पुलावर आला. कठड्यावर चढून त्याने कपड्यांसह नदीत उडी मारली. पुलावरील काही लोकांनी त्याला पाहिले. दीडशे मीटर अंतरापर्यंत तो पाण्यावर तरंगताना दिसून आला. तेथून पुढे दिसेनासा झाला. युवकाच्या अंगावर कपडे व काळ्या रंगाचे जॅकेट होते. यासह त्याने उडी मारल्याने नागरिकांना आत्महत्येची शंका आली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविले. जवानांनी तत्काळ नदीघाटावर धाव घेतली. यांत्रिक बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही.दरम्यान, दुपारी तोरस्कर चौकातील काही तरुण अंघोळीसाठी शिवाजी पुलावर आले. सत्यजित निकम व त्याच्या चौघा मित्रांनी एकाच वेळी पुलावरून पुराच्या पाण्यात उड्या मारल्या. चौघेही दीडशे मीटर अंतर पोहत आले. सत्यजित हा अचानक पाण्याच्या भोवºयात अडकल्याने बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तो बुडाला होता. पाणी गढूळ असल्याने बुडून त्याचा शोध घेता येत नव्हता. त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून नागरिकांना बोलाविले. अग्निशामक दलाचे जवान घरी जाण्याच्या तयारीत असतानाच दुसरा प्रकार घडल्याने पुन्हा त्यांनी शोधमोहीम राबविली. शिवाजी पूल ते राजाराम बंधाºयापर्यंत दोन्ही युवकांचा शोध घेतला. जवानांनी सुमारे सात तास शोधमोहीम राबविली. मात्र, दोघेही मिळून आले नाहीत. दुपारी साडेबाराच्या सुमारास कपड्यासह वाहून गेलेला युवक कोण होता, याबाबत पोलिसांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती मिळाली नाही. या दोन्ही घटनांमुळे नदीघाटावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.सत्यजितची ओळखसत्यजित निकम याने नुकतीच अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्याचे वडील एस. टी. महामंडळात मेकॅनिक म्हणून नोकरी करतात. आई गृहिणी आहे. तोरस्कर चौकात त्यांचे आइस्क्रीमचे दुकान आहे. सत्यजित रिकाम्या वेळी दुकानात बसत असे. अत्यंत कष्टाळू कुटुंब म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्याचा मित्रांमध्ये जास्त सहवास असायचा. एकुलता मुलगा पुरात वाहून गेल्याने निकम कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.सोन्या, कुठे आहेस रे बाळा...घरातून बोलत-चालत बाहेर पडलेला मुलगा सत्यजित महापुरात वाहून गेल्याचे समजताच आई, वडील व नातेवाईक यांना धक्काच बसला. हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी पुलाकडे सर्वांनी धाव घेतली. त्याची आई तर ‘सोन्या, कुठे आहेस रे बाळा...’ म्हणून अश्रू ढाळत होती. शेजारील महिलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. नदीघाटावर आईने फोडलेला हंबरडा मन हेलावून टाकणारा होता.पोलिसाचा हात सोडून मारली उडीसत्यजित निकम व त्याचे मित्र शिवाजी पुलावर आले. कपडे काढून ते कठड्यावर चढत असताना या ठिकाणी बंदोबस्ताला असणाºया पोलिसाने त्यांना रोखले. सत्यजितचा हात पकडून पाण्यात उडी मारू नकोस म्हणून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसाचा हात सोडून त्याने थेट पुराच्या पाण्यात उडी मारली.