ट्रकची दुचाकीला धडक, दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:28+5:302021-01-13T05:03:28+5:30
पन्हाळा, कसबा बावडा : रत्नागिरी मार्गावरील वाघबीळनजीक रविवारी रात्री उशिरा ट्रक व मोटरसायकल यांची धडक होऊन ...

ट्रकची दुचाकीला धडक, दोन युवक ठार
पन्हाळा, कसबा बावडा : रत्नागिरी मार्गावरील वाघबीळनजीक रविवारी रात्री उशिरा ट्रक व मोटरसायकल यांची धडक होऊन मोटरसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले. रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात विशाल आबासाहेब हाके (वय २९, रा. कवलापूर, जि. सांगली) व नितीन आबासाहेब रणदिवे (३१, रा. रणदिवे गल्ली पूर्व, कसबा बावडा) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील विशाल हाके याचे अवघ्या १२ दिवसांपूर्वीच म्हणजेच २७ डिसेंबरला लग्न झाले होते. त्याच्या अंगाची हळद सुकण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नितीन व विशाल हे दोघे मोटरसायकलवरून विशाळगडला निघाले होते. वाघबीळजवळील एका वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक बसली. यात दोघे ठार झाले. विशालची पत्नी लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी गेली होती. नितीन रणदिवे कसबा बावडा परिसरातील नामवंत टेनिस क्रिकेटपटू होता. तो विवाहित असून, त्याला एक लहान मुलगा आहे. शवविच्छेदनानंतर नितीन यांच्यावर कसबा बावडा वैकुंठधाम येथे सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अशोक महादेव पोवार (रा. मलकापूर) याने निष्काळजीपणाने ट्रक चालवल्याबद्दल गुन्हा नोंद झाला.
११नितीन रणदिवे
११विशाल हाके