फसवणूक केल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:36+5:302021-01-08T05:21:36+5:30
सातारा येथील राजेंद्र होटकर यांनी वर्तमानपत्रातील कर्जविषयक जाहिरात वाचून निगवे येथील सुभाष रोहिदास यांच्याशी संपर्क करून कर्जप्रकरणी माहिती घेतली. ...

फसवणूक केल्याप्रकरणी दोन तरुणांवर गुन्हा नोंद
सातारा येथील राजेंद्र होटकर यांनी वर्तमानपत्रातील कर्जविषयक जाहिरात वाचून निगवे येथील सुभाष रोहिदास यांच्याशी संपर्क करून कर्जप्रकरणी माहिती घेतली. रोहिदास यांनी होटकर यांना साठ लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो असे सांगून ३ टक्के प्रोसिसिंग फी देण्यास सांगितले. होटकर यांनी रोहिदास व त्यांचे सहकारी राज कांबळे यांना रोख व एनएएफटीच्या माध्यमातून मे २०१९ पासून वेळोवेळी दोन लाख, सोळा हजार रुपये दिलेत. रोहिदास व कांबळे यांनी संगनमताने हे पैसे घेतले व कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली. होटकर यांनी, कर्ज मिळत नसेल तर घेतलेले पैसे परत मागितले. पण त्यांनी ते देण्यास टाळाटाळ करून पैसे परत न मागण्याची धमकी दिली होती. पोलीस शिपाई अनिल पाटील अधिक तपास करत आहेत.