शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

मराठी भाषिक वाघ आहे, बेळगावात मराठी स्टेटस ठेवल्यामुळे दोन तरुणांना पोलिसांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:28 IST

शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला, मराठी फलकांची मोडतोड या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागातील वातावरण कन्नड - मराठी मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापले असून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून belgaon Police Kolhapur- बेळगावमध्ये सुरू असलेल्या घटना, कन्नड संघटनांचा धुडगूस आणि यानंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या तरुणांनी मराठी भाषिक वाघ आहे, असे स्टेटस ठेवले होते.

ठळक मुद्देबेळगावात मराठी स्टेटस ठेवले दोन तरुणांना पोलिसांची बेदम मारहाण

बेळगाव : शिवसेनेच्या बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर झालेला हल्ला, मराठी फलकांची मोडतोड या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागातील वातावरण कन्नड - मराठी मुद्द्यावरून पुन्हा एकदा तापले असून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यापासून बेळगावमध्ये सुरू असलेल्या घटना, कन्नड संघटनांचा धुडगूस आणि यानंतर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या दोन तरुणांना कर्नाटकपोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या तरुणांनी मराठी भाषिक वाघ आहे, असे स्टेटस ठेवले होते.शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीवर शुक्रवारी कन्नड कार्यकर्त्यांनी हल्ला करून गाडीच्या मराठी क्रमांक असलेल्या बोर्डची काळे फासून मोडतोड केली होती. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो काही जणांनी फेसबुकवर पोस्ट करून मराठी भाषिक वाघ आहे असे मोबाइलवर स्टेटस ठेवले होते.

यानंतर कर्नाटकपोलिसांनी तरुणांची धरपकड सुरू केली आहे. याप्रकरणी दोन तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. या तरुणांना पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, अन्य एका घटनेत चार तरुणांना अटक करून सोडून देण्यात आले आहे. मारहाणीच्या या घटनेचा मराठी भाषिकांनी निषेध केला आहे.कर्नाटक पोलिसांवर मराठी जनता नाराजसीमा भागातील मराठी भाषिकांवर नेहमीच कर्नाटक सरकार आणि पोलीस अन्याय करतात. या अन्यायाला अनेकवेळा वाचा फोडण्यात आली आहे; परंतु आजतागायत कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर गुलामगिरीची सत्ता लादत आहे. लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून मराठी तरुणांवर अशी कारवाई करणाऱ्या पोलीस विभागावर मराठी जनता तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. 

टॅग्स :belgaonबेळगावPoliceपोलिसKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूर