शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारांना पाच वर्षांत दुप्पट मजुरीवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:36 IST

इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

अतुल आंबी ।इचलकरंजी : येथील यंत्रमाग कामगारांनी २०१३ साली ३९ दिवस काम बंद आंदोलन करून मिळविलेली मजुरीवाढ व केलेला करार यामुळे या पाच वर्षांत कामगारांच्या मजुरीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. २०१३ साली असलेली ५२ पिकास ५८.५ पैसे मजुरी आज एक रुपये ५ पैसे झाली आहे. या मजुरीवाढीमुळे बोनसची रक्कमही वाढली आहे. सर्व कामगार संघटनांनी एकत्रित उभारलेल्या लढ्याचे हे फलित म्हणावे लागेल.

सन २०१३ पूर्वी तीन वर्षांतून एकदा यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटना यांचे प्रतिनिधी व प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवाद समिती नेमून मजुरीवाढ ठरवली जात होती. या परंपरेनुसार काही वर्षे मजुरीवाढ घोषित केली जात होती. त्यानुसार २०१३ साली ५२ पिकाला ५८.५ पैसे मजुरी होती. त्यावेळी सर्व यंत्रमाग कामगार संघटनांनी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. मजुरीवाढीचा तिढा सुटत नसल्याने २१ जानेवारी २०१३ ला सुरू झालेले आंदोलन लांबत जाऊन तब्बल ३९ दिवसांनी २८ फेब्रुवारी २०१३ ला कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे तोडगा काढून संपविण्यात आले.

यावेळी मागील काही वर्षांत समाधानकारक मजुरीवाढ झाली नाही. सद्य:परिस्थितीत वाढलेली महागाई, कर्जबाजारी होत चाललेला कामगार अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सन २०१३ सालच्या करारामध्ये २८.५ पैशांची मोठी मजुरीवाढ घोषित करण्यात आली. त्यामुळे ५८.५ पैशांवरून कामगारांना ८७ पैसे मजुरी झाली. या मजुरीवाढीबरोबरच प्रत्येक तीन वर्षांनी आंदोलने करावी लागू नयेत, यासाठी सर्वमान्य तोडगा म्हणून शासनाकडून घोषित केल्या जाणाºया महागााई भत्त्याला या मजुरीवाढीची सांगड घालण्यात आली.त्यामध्ये वर्षातून दोनदा घोषित होणाºया महागाई भत्त्याची रक्कम एकत्रित करून त्याचे पीस रेटवर रूपांतर करून प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबरपूर्वी सहायक कामगार आयुक्त कार्यालयातून याची घोषणा करावी, असा करार करण्यात आला.

२०१३ साली झालेल्या या करारानुसार दरवर्षी मजुरीवाढ घोषित केली जाते. त्यामध्ये २०१४ साली ४ पैसे, २०१५ साली ७ पैसे, २०१६ साली ७ पैसे अशी मजुरीवाढ घोषित करण्यात आली आहे.त्याप्रमाणे सध्या एक रुपये ५ पैशांपर्यंत ही मजुरीवाढ पोहोचली आहे. २०१३ साली असलेली ५८.५ पैशांची मजुरी पाच वर्षांत दामदुप्पट होऊन एक रुपये ५ पैशांपर्यंत पोहोचली आहे. सन २०१३ नंतर दरवर्षी २०१६ पर्यंत घोषित झालेली १८ पैशांची मजुरीवाढ व त्याप्रमाणात वाढलेली बोनसची रक्कम पाहता पाच वर्षांत कामगाराची मजुरी दामदुप्पट झाली आहे.‘बोनस’चा हिशेब वेगळाचसन २०१३ पूर्वी २३ ते २७ टक्क्यांपर्यंत बोनस दिला जात होता. २०१३ सालच्या करारामध्ये १६.६६ टक्के बोनस ठरविण्यात आला. मात्र, मजुरीवाढ झाल्यामुळे कामगारांना बोनसची रक्कमही आपोआपच वाढून मिळाली. ५८.५ पैसे मजुरी असताना सरासरी २५ टक्क्यांनी चौदा हजार ६२५ रुपयांच्या जवळपास मिळणारा बोनस हा ८७ पैसे मजुरी झाल्यानंतर १६.६६ टक्क्यांनी चौदा हजार ४९४ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर दरवर्षी होणाºया मजुरीवाढीनुसार त्यावरील टक्केवारीनुसार बोनसच्या रकमेतही वाढ होत गेली आहे.मजुरीवाढीचा हिशेबएक कामगार एका वर्षात आठ माग बारा तास काम केल्यास सरासरी एक लाख मीटर कापड उत्पादन करतो. त्यानुसार २०१३ सालच्या ५८.५ पैसे मजुरीनुसार त्याला वर्षाचे ५८ हजार ५०० रुपये अधिक सरासरी २५ टक्क्यांनी दिला जाणारा चौदा हजार ६२५ रुपयांचा बोनस असे ७३ हजार १२५ रुपये कामगारांना मिळत होते. २०१३ सालच्या २८.५ पैसे मजुरीवाढीमुळे ८७ पैसे मजुरी झाली. वरील हिशेबाप्रमाणे ८७ हजार रुपये अधिक १६.६६ प्रमाणे दिला जाणारा चौदा हजार ४९४ रुपयांचा बोनस असे एक लाख १ हजार ४९४ रुपये कामगाराला मिळू लागले.३९ दिवसांच्या संपाचे अन्य परिणामएकूण ३९ दिवस संप झाला असला तरी चाळीसाव्या दिवशी शुक्रवार असल्याने त्यादिवशी यंत्रमाग बंदच राहिले. त्यानंतर शनिवारपासून शहरातील यंत्रमाग टप्प्याटप्प्याने सुरू झाले. त्यामुळे घडी बसण्यासाठी पुढे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी गेला. एकूण ५०-६० दिवसांच्या या बंदमुळे वस्त्रोद्योग मंडीवर परिणाम झाला. कापडाची मागणी घटणे, घेतलेले काम वेळेत पूर्ण करून न दिल्याने बाहेरील कापड मंडीतून व्यक्त होणारी नाराजी, यंत्रमागधारकांचे बॅँकांकडे थकलेले हप्ते असे अनेक परिणाम वस्त्रोद्योगाला सहन करावे लागले.

टॅग्स :Power Shutdownभारनियमनkolhapurकोल्हापूर