भांडी चोरणाऱ्या दोन महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:18+5:302021-08-20T04:29:18+5:30

कोल्हापूर : येथील न्यू महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरानजीक घरातील २५ हजार ५०० रुपये किमतीची भांडी, साड्या चोरल्याप्रकरणी जुना ...

Two women who stole utensils are missing | भांडी चोरणाऱ्या दोन महिला गजाआड

भांडी चोरणाऱ्या दोन महिला गजाआड

कोल्हापूर : येथील न्यू महाद्वार रोडवरील बिनखांबी गणेश मंदिरानजीक घरातील २५ हजार ५०० रुपये किमतीची भांडी, साड्या चोरल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोन महिलांना अटक केली. नम्रता गायकवाड (वय ४५), सीमा पंडागळे (५० दोघेही रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश गजानन पावसकर (रा. मरगाई गल्ली, शिवाजी पेठ) यांचे न्यू महाद्वार रोडवर बिनखांबी गणेश मंदिरानजीक मूळचे घर आहे. पावसामुळे या घराची पश्चिमेकडील भिंत पडली होती. चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पडलेल्या भिंतीच्या बाजूने त्यांच्या घरात प्रवेश करून आतील पितळ व तांब्याची भांडी तसेच साड्या, असा सुमारे २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. जुना राजवाडा पोलिसांनी तपास करून नम्रता गायकवाड, सीमा पंडागळे या दोघींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला.

फोटो नं. १९०८२०२१-कोल-नम्रता गायकवाड (आरोपी)

फोटो नं. १९०८२०२१-कोल-सीमा पंडागळे (आरोपी)

190821\19kol_4_19082021_5.jpg~190821\19kol_5_19082021_5.jpg

फोटो नं. १९०८२०२१-कोल-नम्रता गायकवाड (आरोपी)फोटो नं. १९०८२०२१-कोल-सीमा पंडागळे (आरोपी)~फोटो नं. १९०८२०२१-कोल-नम्रता गायकवाड (आरोपी)फोटो नं. १९०८२०२१-कोल-सीमा पंडागळे (आरोपी)

Web Title: Two women who stole utensils are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.