शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

Kolhapur: दूध संस्थेच्या कारभारावर आवाज उठविला, अन् नणुंद्रेतील 'त्या' दोघींनी डेअरी व्यवसाय यशस्वी करुन दाखविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 17:18 IST

जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण, संगणकाचे ज्ञानही नाही; कष्टातून घेतली यशस्वी भरारी

विक्रम पाटीलकरंजफेण :  पुरूषांची मक्तेदारी असलेल्या दूध डेअरीच्या व्यवसायात पन्हाळा तालुक्यातील नणुंद्रे येथील दोन रणरागिणींनी सक्रीय सहभाग घेऊन दूध डेअरीचा व्यवसाय यशस्वीपणे चालवून दाखविला आहे. शेणाघाणीपासून व दुधाच्या धारा काढण्याच्या कामापुरत्या मर्यादित न रहाता दूध डेअरीचा कारभार आम्हाला देखील सुरळीत चालवता येतो हे प्रत्यक्ष कृतीतून  दाखवून देऊन चांगल्या प्रकारे कारभार कसा चालवावा याचे देखील उदाहरण घालून दिले आहे.खेड्यापाड्यात जणावरासाठी लागणारा ऊसाचा पाला काढण्यापासून ते जणावरांच्या शेणाघाणीपासून  दुधाच्या धारा काढून डेअरीत दूध घालण्यापर्यंत सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत महिलांचे हात गुंतलेले असतात.मात्र दूध व्यवसायात पुरूषांचीच मक्तेदारी अनेक वर्षापासून टिकून राहिली असल्याने अनेक ठिकाणी पुरूष देईल तो हिशोब कष्टकरी महिलांना निमूटपणे सहन करावा लागतो. अशाच घटनेतून  नणुंद्रे येथील दोन महिला पाच वर्षापूर्वी पुढे आल्या. अन् दूध डेअरीतून पुरूषांना बाजूला सारून दोघींनी डेअरीचा कारभार आपल्या ताब्यात घेत अगदी सुरळीतपणे चालवून दाखविला.नणुंद्रे येथील स्व.तुकाराम बाऊचकर यांनी स्थापन केलेल्या श्री.कृष्ण दुध संस्थेचा कारभार अनेक वर्षे पुरूष मंडळींच्या हातात होता. मात्र पाच वर्षापूर्वी कष्टकरी महिलांना तो मान्य नसल्यामुळे त्यांनी आवाज उठविला. त्यावेळी जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या रेखा बाऊचकर यांनी सचिव पदाची तर जयश्री बाऊचकर यांनी मापाडी म्हणून कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी पेलण्याची सहमती दर्शविली. दूध संकलण करून ते वारणा संघाला पोहचवणं व त्याचा वेळच्यावेळी हिशोब ठेऊन उत्पादकांना मोबदला देण हे सार त्यांच्यासाठी नवीनचं होते. लिलया पार पाडू लागल्या कामे संगणक हाताळण्याचे जरा देखील त्यांना ज्ञान नव्हते. तरी देखील या दोन रणरागिणींनी सर्व ज्ञान आत्मसात करून घेतले व दोन्ही सत्रात संकलन करून दुधाची उत्पादन क्षमता तब्बल ३५० लिटर पर्यंत नेऊन पोहचवलीयं, दूध संकलन करून झाल्यावर दुधाने भरलेली कॅन टेंपोत टाकण्यापर्यंत त्या कामे लिलया पार पाडू लागल्या. प्रामाणिक कष्टाला बळ म्हणून रेखा बाऊचकर यांना दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पार्टीने भरघोस मतांनी निवडून आणून सदस्य पदाची जबाबदारी देखील सोपवली.

दूध संस्था लाखो रूपये नफ्यात

या दोघी दूध उत्पादकांच्या कष्टाचा रूपया अनं रूपया कष्टकरी उत्पादकांच्या पदरात कसा पडेल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. दोघींच्या प्रयत्नाने व्यवहार पारदर्शी बनला असल्याने दूध संस्था लाखो रूपये नफ्यात आणून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. त्यातूनच या दोघींनी इतरांच्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधbusinessव्यवसायWomenमहिला