उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: November 29, 2015 01:16 IST2015-11-29T01:13:47+5:302015-11-29T01:16:09+5:30
मृत माजनाळ येथील

उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार
कोल्हापूर : पुशिरे-पुनाळ रस्त्यावर शनिवारी रात्री उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार झाला. शंकर सखाराम पाटील (वय ६४, रा. माजनाळ, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पुशिरे-पुनाळ रस्त्यावरून रात्री शंकर सखाराम पाटील दुचाकीवरून निघाले असता त्यांच्या दुचाकीची धडक थांबलेल्या उसाच्या ट्रॅक्टर-ट्रालीला बसली. यात त्यांच्या डोळ्यास जबर मार लागून ते जागीच ठार झाले. त्यांना ग्रामस्थांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले; पण डॉक्टरांनी ते उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. हा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडून कळे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)