टॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST2021-05-15T04:24:28+5:302021-05-15T04:24:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : मिणचे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅँकरने मोटरसायकल जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ...

The two-wheeler was killed on the spot in the collision | टॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

टॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : मिणचे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टॅँकरने मोटरसायकल जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार हा अपघात वडगाव- हातकणंगले रस्त्यावर दुपारी झाला.

या अपघातात विश्वनाथ नारायण पाटील (वय ३७, रा.नानीवळे वसाहत, खोची) असे दुर्दैवी मृत पावलेल्याचे नाव आहे.याबाबत फिर्याद एकनाथ नारायण पाटील यांनी दिली.

घटनास्थळावरून व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार: नरंदे येथील शरद साखर कारखान्यातून मोलॅसीस घेऊन टॅकर (एम एच १० बी आर ७४७२) जयगड,रत्नागिरी येथे निघाले होते.तर खोची येथील वीज वितरण कंपनीतील मीटर रीडिंग ठेकेदार असलेले पाटील हे खोचीकडे मोटरसायकल (एम एच ०९ बीएल ६०३४) निघाले होते.दरम्यान मिणचे गावच्या हद्दीत हाॅटेल कोहिनूरसमोर मोलॅसीस टॅकरने धडक दिल्याने पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी पोलिस पाटील संदीप घाडगे यांनी यांनी मृतदेहास बळवंतराव यादव हाॅस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली.मृतदेहांची उत्तरीय तपासणी नवे पारगांव येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.पाटील यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा,दोन मुली असा परिवार आहे.तपास पोलिस निरीक्षक संतोष घोळवे,पोलिस नाईक रणवीर जाधव, आर. ए. पाटील करीत आहेत. टॅँकरसह चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: The two-wheeler was killed on the spot in the collision