वळीवडे येथील दुचाकीचोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:00+5:302021-09-14T04:29:00+5:30

कोल्हापूर : गांधीनगर येथून दुचाकी चोरल्याप्रकरणी वळीवडे (ता. करवीर) येथील तरुणास गांधीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. रामचंद्र निवृत्ती ...

Two-wheeler thief arrested at Waliwade | वळीवडे येथील दुचाकीचोरट्यास अटक

वळीवडे येथील दुचाकीचोरट्यास अटक

कोल्हापूर : गांधीनगर येथून दुचाकी चोरल्याप्रकरणी वळीवडे (ता. करवीर) येथील तरुणास गांधीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. रामचंद्र निवृत्ती पोवार (वय ४०, रा. वळीवडे, ता. करवीर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. दुचाकी चोरीला गेल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणून चोरट्यास पोलिसांनी गजाआड केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी गांधीनगर येथील बॅंक ऑफ इंडियासमोर विमलकुमार नारायणदास पमनामी (वय २२, रा. गांधीनगर) यांनी आपली दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरुन नेली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद आहे. दरम्यान, गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते, त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रामचंद्र पोवार यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिले. पण त्यानंतर ‘खाक्या’ दाखवला असता, त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली, त्याने ती दुचाकी दुचाकी गांधीनगर ग्रामपंचायत येथील पाण्याच्या टाकीसमोर उभी केल्याची कबुली दिली, त्यानुसार पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली. ही कारवाई करवीर पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राम माळी, सुजय दावणे, सुनील कुंभार, विजयकुमार शिंदे, सुनील माळी, रोहित कदम यांनी केली.

फोटो नं. १३०९२०२१-कोल-रामचंद्र पोवार (आरोपी)

130921\13kol_3_13092021_5.jpg

फोटो नं. १३०९२०२१-कोल-रामचंद्र पोवार (आरोपी)

Web Title: Two-wheeler thief arrested at Waliwade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.