गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST2021-03-19T04:22:34+5:302021-03-19T04:22:34+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर शहराकडे नेहमीप्रमाणे कामावर येणा-या एका दुचाकीस्वारावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शंकर गणपती गायकवाड (वय ३५ ...

Two-wheeler injured in cow attack | गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर शहराकडे नेहमीप्रमाणे कामावर येणा-या एका दुचाकीस्वारावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शंकर गणपती गायकवाड (वय ३५ रा. खेडखोळ, ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी पहाटे पन्हाळा गडानजीक संजीवनी पब्लिक स्कूलनजीक घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शंकर गायकवाड हे कोल्हापुरात नोकरीस आहेत. गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते घरातून दुचाकीवरून कोल्हापूरला येण्यासाठी बाहेर पडले. ते संजीवनी पब्लिक स्कूलनजीक आले असता त्यांना रस्त्यावरच गव्याने धडक दिली. धडकेनंतर गायकवाड हे दुचाकीवरून रस्त्यावर पडले. त्याच अवस्थेत त्यांनी तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Two-wheeler injured in cow attack