वडगाव शहरात टू व्हिलर फायर बुलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:49+5:302021-08-22T04:27:49+5:30
पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे महाराष्ट्र अग्निसुरक्षा महाअभियान योजनेंतर्गत आलेल्या टू व्हिलर फायर बुलेट गाडीचे पूजन नगराध्यक्ष ...

वडगाव शहरात टू व्हिलर फायर बुलेट
पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे महाराष्ट्र अग्निसुरक्षा महाअभियान योजनेंतर्गत आलेल्या टू व्हिलर फायर बुलेट गाडीचे पूजन नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई उपस्थित होते.
वडगाव नगरपालिकेकडून शहर व ग्रामीण भागात अग्निशमन सेवा पुरविली जाते. वडगाव प्रमुख व्यापारी, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये, न्यायालये, खाजगी व सहकारी संस्था, रुग्णालये आहेत. वडगाव पालिकेच्या गावठाण हद्दीमध्ये रस्ते अरुंद असलेने अग्निशमन वाहन जाण्यास अडचणी येतात. यासाठी महाराष्ट्र अग्निसुरक्षा महाअभियान योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समिती यांच्या अनुदान रकमेमधून टू व्हिलर फायर बुलेट गाडी व ९ लिटर वॉटर मिस्ट अँड सीएएफ फायर इक्स्टिंग्युशर एचपी मोटारसायकल माउंटेड हे मटेरिअल खरेदी करण्यात आले आहे.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, नगरसेवक शरद पाटील, संदीप पाटील, सुनीता पोळ, मैमून कवठेकर, शबनम मोमीन, सावित्री घोटणे आदी उपस्थित होते.
२१ वडगाव टू व्हिलर फायर बुलेट
फोटो कॅप्शन : पेठवडगाव : वडगाव पालिकेच्या टू व्हिलर फायर बुलेट गाडीच्या पूजनप्रसंगी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, शरद पाटील, संदीप पाटील, सुनीता पोळ, शबनम मोमीन, सावित्री घोटणे, मैमून कवठेकर आदी उपस्थित होते.