घोसरवाड, टाकळीवाडी, दानवाडमध्ये दुरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:12+5:302021-01-13T05:00:12+5:30

घोसरवाड येथे परंपरागत शिंदे सरकार पॅनल यांच्याविरोधात महाआघाडीमध्ये दुरंगी लढत होत आहे. तेथे मानसिंग खोत व रामचंद्र लगड यांच्या ...

Two-way fight in Ghosarwad, Takliwadi, Danwad | घोसरवाड, टाकळीवाडी, दानवाडमध्ये दुरंगी लढती

घोसरवाड, टाकळीवाडी, दानवाडमध्ये दुरंगी लढती

घोसरवाड येथे परंपरागत शिंदे सरकार पॅनल यांच्याविरोधात महाआघाडीमध्ये दुरंगी लढत होत आहे. तेथे मानसिंग खोत व रामचंद्र लगड यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. तर १५ पैकी एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. टाकळीवाडी येथील ११ जागांपैकी दहा जागांवर निवडणूक होत असून प्रभाग क्रमांक ३ मध्ये अपक्ष उमेदवारामुळे तिरंगी लढत होत आहे. तर इतरत्र दुरंगी लढतीने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. जुने दानवाड येथे मागील दोन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, यावेळी युवकांनी घेतलेल्या आघाडीमुळे बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे तेथेही दुरंगी लढत जोरात सुरू आहे. दत्तवाड येथे बहुरंगी लढत असून सतरा जागांसाठी वेगवेगळ्या आघाड्या प्रत्येक प्रभागात झाल्या असून स्व. बंडा माने ग्रामविकास परिवर्तन पॅनल सर्वाधिक १५ जागा लढवत आहे. तर त्या पाठोपाठ यड्रावकर गटाच्या नूर काले युवा मंच दत्तवाड ग्रामविकास पॅनल दहा जागा लढवत आहे. स्वाभिमानी महाविकास आघाडीने नऊ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. अपक्ष उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे. प्रभाग तीनमध्ये दुरंगी तर इतर प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत.

Web Title: Two-way fight in Ghosarwad, Takliwadi, Danwad