गडहिंग्लजमधील दोन प्रभाग हॉट स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:23+5:302021-04-23T04:25:23+5:30

गडहिंग्लज शहरातील प्रभाग ८ व ९ हे हॉट स्पॉट बनले आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण या ...

Two ward hot spots in Gadhinglaj | गडहिंग्लजमधील दोन प्रभाग हॉट स्पॉट

गडहिंग्लजमधील दोन प्रभाग हॉट स्पॉट

गडहिंग्लज शहरातील प्रभाग ८ व ९ हे हॉट स्पॉट बनले आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण या दोन प्रभागांत सापडले आहेत; तर उर्वरित ३० टक्के रुग्ण हे शहरातील विविध प्रभागांत आढळून आले आहेत.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. त्यांपैकी तब्बल ४५ रुग्ण या दोन प्रभागांत आढळले आहेत; तर उर्वरित १७ रुग्ण अन्य सात प्रभागांमध्ये आहेत. शहरातील रुग्णांमध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या अधिक आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य बाधित होण्याचेही प्रमाण वाढले आहे. प्रभाग ८ मध्ये अयोध्यानगर, कोड्ड कॉलनी, बी. बी. पाटील कॉलनी हा परिसर येत असून हद्दवाढ क्षेत्रामध्ये प्रभाग ९ विखुरलेला आहे.

वाढती रुग्णसंख्या हा प्रशासनापुढे चिंतेचा विषय बनला आहे. त्यासाठी शहरातील सुपर स्प्रेडर आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी पालिका व उपजिल्हा रुग्णालयातर्फे मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Two ward hot spots in Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.