शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून दोन हजारच्या ७५० कोटींच्या नोटा जमा, उद्यापासून देवाण-घेवाण थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 15:51 IST

रमेश पाटील कोल्हापूर : सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी आता केवळ दोन ...

रमेश पाटील

कोल्हापूर : सर्वाधिक मूल्य असलेली दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा अवधी जरी शिल्लक राहिला असला, तरी गेल्या चार महिन्यांत कोल्हापूरकरांनी सुमारे ७५० कोटी रुपयांच्या दोन हजार नोटांचा भरणा बँकांत जमा केला आहे. जमा झालेला दोन हजार रुपयांचा भरणा बँक ट्रेझरीकडून टप्प्याटप्प्याने रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती बँक वर्तुळातून देण्यात आली.दोन हजारच्या नोटा बदलून घेण्याची अथवा बँक खात्यावर जमा करण्याची मुदत शुक्रवारी (दि. २९) सप्टेंबरला ग्राहकांसाठी बंद होत आहे. तर बँकांत जमा झालेल्या नोटा ट्रेझरीमार्फत ३० सप्टेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवून द्यावयाची मुदत आहे. सध्या जमा झालेल्या नोटा एकत्रित करून रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्याची बँकांची तयारी सुरू झाली आहे.दोन हजारच्या नोटा बदलून घेण्यासाठी अथवा खात्यावर भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळेल किंवा नाही याबाबत बँकांकडे अद्याप स्पष्ट असे कोणतेच आदेश आलेले नाहीत. त्यामुळे २९ सप्टेंबरनंतर कोणत्याच बँका अशा नोटा ग्राहकांकडून स्वीकारणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.१९ मे रोजी दोन हजारची नोट चलनातून मागे घेण्यात येत असल्याची घोषणा झाली.तसेच आपल्याकडील नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली, अशी घोषणा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बँकांमध्ये दोन हजारची नोट जमा करण्यासाठी अथवा नोटा बदलून घेण्यासाठी लोकांनी खूपच गर्दी केली. बघता-बघता अनेक बँकांत दिवसाला कोट्यवधी रुपये जमा होऊ लागले. तर काही ग्राहकांनी बँकांत पैसे भरून ते एटीएमद्वारे लगेचच विड्रॉल केले.बँकांत जमा झालेल्या दोन हजारच्या नोटा पुन्हा ग्राहकांना चुकूनही देऊ नयेत अथवा एटीएममध्येही अशा नोटांचा भरणा करू नये, अशा सूचना असल्यामुळे या नोटा बँकांत थप्पीला लागल्या. नोटबंदीच्या आदेशानंतर दीड महिन्याने या जमा झालेल्या नोटा बँका ट्रेझरीकडे पाठवू लागल्या. कोल्हापुरातील सर्वच ट्रेझरीकडून गेल्या चार महिन्यांत सुमारे ७५० कोटी रुपयांच्या नोटा पाठवल्याची माहिती बँक सूत्रांनी दिली. सध्या किरकोळ स्वरूपात बँकांकडे अशा नोटा जमा होताना दिसत आहे. त्याही ३० सप्टेंबरला रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात येणार आहेत.

दोन हजारची चलनातील देवाण-घेवाण थांबली..२ हजारची नोट २९ सप्टेंबरपर्यंत चलनात ग्राह्य धरली जाईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जरी जाहीर केले असले, तरी गेल्या एक महिन्यापासून मार्केटमध्ये अशी नोट कोणीही सहजासहजी स्वीकारत नसल्याचे वास्तव आहे. अनेक पेट्रोलपंपांवर तर अशी नोट घेतलीच जात नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही अशी नोट आहे त्यांना बँकेत २९ सप्टेंबरच्या आत भरणा केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNote BanनोटाबंदीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक