नांगनूरमध्ये म्हैशीच्या छातीतून काढले दोन चमचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:14+5:302021-07-30T04:25:14+5:30

हलकर्णी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील मधुकर घोरपडे यांच्या म्हैशीने आठ दिवसांपूर्वी बादलीतील पाणी पितेवेळी २ चमचे ...

Two tablespoons extracted from buffalo breast in Nanganur | नांगनूरमध्ये म्हैशीच्या छातीतून काढले दोन चमचे

नांगनूरमध्ये म्हैशीच्या छातीतून काढले दोन चमचे

हलकर्णी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील मधुकर घोरपडे यांच्या म्हैशीने आठ दिवसांपूर्वी बादलीतील पाणी पितेवेळी २ चमचे गिळले होते. हे चमचे म्हैशीच्या छातीमध्ये अडकल्याने म्हैशीला मोठा धोका निर्माण झाला होता.

दरम्यान, बुधवारी (दि. २८) हे चमचे म्हैशीची छाती फाटून थोडे बाहेर आल्याचे घरातील मंडळींनी पाहिले. यावेळी ते चमचे काढण्याचा प्रयत्न म्हैस मालकांनी केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी पशुचिकित्सक रामा नाशिपुडे यांना बोलावले. त्यांनी शस्त्रक्रिया करूनच ते बाहेर काढावे लागतील, असे सांगितले.

त्यानुसार तालुका पशुवैद्यकीय अधिकारी विराज वाघ, वर्षाराणी वाघ, शिवशंकर चिक्कोडे, पंकज सोनोने, आशिष टेकळे यांनी हे दोन्ही चमचे शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढले.

फोटो ओळी : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे मधुकर घोरपडे यांच्या म्हैशीने गिळलेले चमचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विराज वाघ व सहकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढले.

क्रमांक : २९०७२०२१-गड-०३

Web Title: Two tablespoons extracted from buffalo breast in Nanganur