मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:27+5:302021-08-21T04:29:27+5:30

निगवे गावच्या हद्दीत देवांश हाॅटेलजवळ टेम्पोचे पंक्चर काढत असताना दोघा अनोळखी व्यक्तींनी फोन लावायचा आहे, असे सांगून त्यांच्याकडून जबरदस्तीने ...

Two suspects arrested for snatching mobile phones | मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा संशयितांना अटक

मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा संशयितांना अटक

निगवे गावच्या हद्दीत देवांश हाॅटेलजवळ टेम्पोचे पंक्चर काढत असताना दोघा अनोळखी व्यक्तींनी फोन लावायचा आहे, असे सांगून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल हॅण्डसेट हिसकावून मोटारसायकलवरून धूम ठोकली. या गुन्ह्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली होती. त्याचा समांतर तपास करवीर पोलीस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांच्या आदेशाने तेथील पोलीस कर्मचारी करीत होते. याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तपासातील अंमलदारास विचारेमाळ कोरगांवकर हायस्कूलजवळ वर्णनाप्रमाणे दोन संशयित काळ्या रंगाच्या दुचाकीजवळ थांबले होते. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन मोबाईल हँडसेट मिळाले. त्याची कागदपत्रे मागितली असता त्यांना प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय अधिक बळावल्यानंतर तपासाअंती दोघांनी निगवे गावच्या हद्दीतील हाॅटेलजवळ पंक्चर झालेल्या टेम्पोजवळ चालकाकडून व एप्रिल २०२१ मध्ये वडणगे येथे बसस्टाॅपजवळ उभ्या असलेल्या इसमाचाही मोबाईल अशाच पद्धतीने पळविल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईलसह दुचाकी असा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. ही कामगिरी करवीर उपविभागीय अधिकारी आर.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राम माळी, सुजय दावणे, सुनील कुंभार, विजयकुमार शिंदे, आकाश पाटील, सुनील माळी, रोहित कदम यांनी केली.

Web Title: Two suspects arrested for snatching mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.