विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा दुदैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:06+5:302020-12-09T04:21:06+5:30

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शाळा बंद असल्यामुळे निखिल हा बेकिनकेरे येथील मामाच्या घरी राहण्यास आला होता. मंगळवारी सकाळी ...

Two school children drown in well | विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा दुदैवी मृत्यू

विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा दुदैवी मृत्यू

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, शाळा बंद असल्यामुळे निखिल हा बेकिनकेरे येथील मामाच्या घरी राहण्यास आला होता. मंगळवारी सकाळी लोकेश व निखिल अन्य एका मित्राला घेऊन घराच्या पाठीमागे असलेल्या शिवारात खेळण्यासाठी गेले होते. ८ ते १० वर्षे वयोगटातील या मुलांपैकी लोकेश व निखिल खेळता खेळता पाय घसरून नजीकच्या विहिरीमध्ये पडले. त्यावेळी आसपास कोणीही नसल्यामुळे ही घटना समजण्यास उशीर झाला. मुले घरी न परतल्यामुळे शोध घेतला असता विहिरीत मृतदेह आढळले. या दुर्घटनेतून तिसरा मुलगा सुदैवाने बचावला.

विहिरीत मुले पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सीपीआय राघवेंद्र हल्लुर पीएसआय ए. वाय. अविनाश, शिवानंद कौजलगी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत लोकेश पाटील यांच्या पश्चात आई -वडील, बहीण, आजी व काका-काकू तर निखिल बोंद्रे त्याच्या पश्चात आई-वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.

या शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे बेकिनकेरे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, बेकिनकेरे शिवार परिसरात अशा जवळपास १०-१५ धोकादायक विहिरी वापराविना तशाच पडून आहेत. कठडा नसलेल्या जमिनीलगत असणाऱ्या या विहिरी पाहणाऱ्यांच्या सहसा निदर्शनास येत नाहीत. परिणामी रात्रीच्या वेळी तर या विहिरी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. संबंधित विहिरी तत्काळ बुजवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

फोटो मयत मुलं 1. लोकेश पाटील 2.निखिल बोन्द्रे

Web Title: Two school children drown in well